ETV Bharat / state

परतूर शहरातून दोन क्विंटल गोमांस जप्त; पाच जण अटकेत - jalna police news

परतूर शहरातून आज (दि. 9) दोन क्विंटल गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

five arrested with two quintal Beef in jalna
गोमांस नष्ट करताना
author img

By

Published : Mar 9, 2021, 8:28 PM IST

जालना - मोटारीमध्ये गाय, वासरांना घालून चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच परतूर शहरातून आज (दि. 9) दोन क्विंटल गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

गाई चोरी जाण्याचे वाढले होते प्रमाण

जालना शहरासह जिल्ह्यांमधून जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. विशेष करून गाय-वासरांची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत होते. त्यातच परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आणि ठाकरे या दोघांना परतूर शहरात गोमांस विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अंभोरे यांनी आपल्या सहकार्‍यांसह कुरेशी मस्जिद जवळील चिंचेच्या झाडाखाली सुरुूअसलेल्या मांस विक्रीच्या दुकानांवर छापा टाकला. या छाप्यात 5 गोमांस विक्रेते पोलिसांच्या हाती लागले. तर काही जण फरार होण्यात यशस्वी झाले. छाप्यात सापडलेल्या पाच जणांकडून पोलिसांनी दोन क्विंटल गोमांस जप्त केले आहे.

हे आहेत आरोपी

गोमांस विक्री करताना सापडलेल्या कसायांमध्ये फिरोज मस्तान कुरेशी, शाहिद अब्दुल्ला कुरेशी, याकोब नादान कुरेशी, शाबाद आरिफ कुरेशी, आसलम अब्दुल रहिम कुरेशी यांचा समावेश आहे. त्यांना अटक करण्यात आली. भां.द.वि.च्या कलम 5 (ब) क, 9 व 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासणीसाठी नमुने ताब्यात

सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गोमांसाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत .उर्वरित गोमांस शहराजवळच एक खड्डा करून त्यामध्ये त्याची विल्हेवाट लावली आहे. सुमारे 32 हजार रुपयांचे हे दोन क्विंटल गो गोमांस आहे.

दोन दिवसांपूर्वीच पकडली होती मोटार

जालना येथील भगत यांच्या मालकीची एक गाय, एक कालवड आणि एक गोरा अशी तीन जनावरे एका प्रवासी मोटारीमध्ये कोंबून चोरून नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग केला. हे वाहन औरंगाबादमध्ये पकडण्यात आले आहे. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा परतूर शहरात दोन क्विंटल गोमांस पकडले आहे. यावरून जालना जिल्ह्यामध्ये गाईंची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा - मृताच्या नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

हेही वाचा - शेतकरी आत्महत्या प्रकरणी बँक व्यवस्थापकावर अखेर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.