ETV Bharat / state

Lumpi disease in Jalna : जालन्यात 'लम्पी' रोगाची दस्तक, पाच जनावरे पॉझिटिव्ह, पशूपालकांची चिंता वाढली - Lumpy skin disease

सध्या देशातील अनेक भागात जनावरे 'लम्पी स्किन' या आजाराने ग्रासले असून, पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. अशात आता या आजाराने भोकरदन तालुक्यातही दस्तक दिली Lumpi disease in Jalna आहे. तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावात शनिवारी पाच जनावरे 'लम्पी स्किन' या आजार पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले five animals detected Lumpi disease positive आहे.

Lumpi disease in Jalna
Lumpi disease in Jalna
author img

By

Published : Sep 11, 2022, 10:34 AM IST

भोकरदन ( जालना ) - सध्या देशातील अनेक भागात जनावरे 'लम्पी स्किन' या आजाराने ग्रासले असून, पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. अशात आता या आजाराने भोकरदन तालुक्यातही दस्तक दिली Lumpi disease in Jalna आहे. तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावात शनिवारी पाच जनावरे 'लम्पी स्किन' या आजार पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले five animals detected Lumpi disease positive आहे.

प्रशासकीय यंत्रणा सतर्क -भोकरदन तालुक्यातील पाच जनावरांचे नमुने पॉझिटिव्ह येताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. वरुड बुद्रुक गावातील दोन गायी व तीन बैलांमध्ये 'लम्पी स्किन' आजरसदृश्य लक्षणे आढळून आले Lumpy skin disease होते. त्यामुळे मंगळवारी या सर्व जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी प्राप्त अहवालात पाचही जनावरांना 'लम्पी स्किन' या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पशुवैद्यकीय विभाग कामाला लागले असून, शनिवारी जिल्हा पशु संवर्धन आधिकारी डॉ.डि.एस.कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पशुसंवर्धन कल्पना क्षिरसागर, पशुधन विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वानखेडे, पशुधन विकास अधिकारी डॉ.रोहीनी साळवे, पशुधन विकास अधिकारी डॉ.राजरत्न वाघमारे, पशुधन पर्यवेक्षक संजय जोशी, अमरदीप जोगदंडे याचे पथक गावात दाखल झाले होते.

यावेळी 'लम्पी स्किन' आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांची पाहणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातही 'लम्पी स्किन' या आजाराचे जनावरे आढळून आल्याची चर्चा सर्वत्र पसरत असल्याने पशुपालन व शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत worry of animal husbandry increased आहे. मात्र, पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना 'लम्पी स्किन' या आजाराची लक्षणे आढळून येताच पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जनावरांचे लसीकरण - तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे पाच जनावरे 'लम्पी स्किन' या आजराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रविवारी परीसरातील जवळपास पाच किमी अंतरावर असलेल्या जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.