ETV Bharat / state

Omicron in Jalna : जालन्यात ओमायक्रॉनची एन्ट्री; दुबईवरून परतलेला रुग्ण पॉझिटिव्ह - जालन्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ (Corona Cases Hike in Jalna) होत आहे. रविवारी (9 जानेवारी) जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron in Jalna) आढळून आला आहे. हा व्यक्ती दुबईमधून जालन्यात परतला होता.

JALNA
जालना जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Jan 10, 2022, 12:48 AM IST

जालना - शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ (Corona Cases Hike in Jalna) होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रविवारी (9 जानेवारी) जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण (Omicron in Jalna) आढळून आला आहे. हा व्यक्ती दुबईमधून जालन्यात परतला होता.

दुबई येथून जालन्यात १ जानेवारी रोजी परतलेल्या एका व्यक्तीचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. सदर अहवाल रविवारी ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

राज्यात रविवारी 44 हजार 388 नव्या कोरोनाबाधितांची नोंद -

राज्यात रविवारी सुमारे 44 हजार 388 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच रविवारी 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक 19 हजार 474 रुग्ण सापडले. शनिवारी 20 हजार रुग्ण आढळून आले होते. तर, राज्यात 2 लाख रुग्ण सक्रिय आहेत. दुसरीकडे आज ओमायक्रॉनच्या रुग्णांनी 200 चा टप्पा पार केला आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - Maharashtra Corona Update - राज्यात 44 हजार 388 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 12 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.