ETV Bharat / state

पुण्याच्या पती-पत्नीने नातेवाईकाला साडे सतरा लाखांना घातला गंडा, गुन्हा दाखल - loan

या घराच्या खरेदीसाठी पुणे येथील पंजाब नॅशनल बँक शाखा खराडी येथून २० लाखाचे कर्ज घेतले होते. ती रक्कम गुलेरिया इस्टर रेसिडेन्सी यांच्या नावे जमा करण्यात आली होती.

पती-पत्नीने नातेवाईकाला साडे सतरा लाखांना घातला गंडा
author img

By

Published : May 15, 2019, 11:24 PM IST

जालना - पुण्याच्या पती-पत्नीने घर घेऊन देण्याच्या बहाण्याने जालन्यातील सरकारी कर्मचाऱ्याला साडेसतरा लाखाला गंडविले आहे. या रकमेची वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्यामुळे शेवटी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती-पत्नीने नातेवाईकाला साडे सतरा लाखांना घातला गंडा

येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सुनील त्र्यंबकराव साळुंके यांनी त्यांच्या पुणे येथील डिघी भागात राहणाऱ्या श्रीकांत त्र्यंबक पाटील या नातेवाईकांच्या मध्यस्थीने पुणे येथीलच श्री गुलेरिया एस्टर रेसिडेन्सीमध्ये एक वन बीएचके फ्लॅट पाहून ४५ लाख ५० हजार रुपयात किंमतही ठरवली. या घराच्या खरेदीसाठी पुणे येथील पंजाब नॅशनल बँक शाखा खराडी येथून २० लाखाचे कर्ज घेतले होते. ती रक्कम गुलेरिया इस्टर रेसिडेन्सी यांच्या नावे जमा करण्यात आली होती. उर्वरित राहिलेली रक्कम ही जालना येथून साळुंखे यांच्या भविष्य निर्वाह निधी व घरबांधणीची अग्रीम रक्कम घेऊन त्यांच्या वेतन खात्यातून साडेआठ लाख रुपये श्रीकांत त्र्यंबक पाटील यांच्या सांगण्यावरून २२ मे २०१७, १७ जून २०१७ आणि ६ जुलै २०१७ या तारखेनुसार साडे आठ लाख रुपये त्र्यंबक पाटील यांच्या सांगण्यावरून जमा केले होते.

उर्वरित साडेसतरा लाख रुपये हे त्र्यंबक सोळंके यांनी त्यांची पत्नी आणि मुलासह तसेच त्यांचे नगर येथील पाहुणे सारंग मुरलीधर पाटील यांच्यासह जाऊन त्र्यंबक पाटील यांच्या पुणे येथील २० डिसेंबर २०१७ रोजी संबंधित बिल्डरला देण्यासाठी रोख रक्कम देऊन आले. त्यानंतर साळुंखे यांनी बिल्डरला फोन करून संबंधित रक्कम मिळाली का? अशी विचारणा केली मात्र ही रक्कम जमा झाले नसल्याचे बिल्डरने सांगितले. त्यानंतर पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. ही रक्कम मी माझ्या वैयक्तिक कामासाठी खर्च केली आहे, ती लवकरच बिल्डरकडे जमा करतो असे सांगून वेळ धकवून नेली. मात्र ही रक्कम बिल्डरकडे न जमा झाल्याने ११ ऑक्टोबरला श्रीकांत त्र्यंबक पाटील यांच्याकडून ही रक्कम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत बिल्डरला देण्यात येईल, अशा पद्धतीची नोटरी जालना येथे करून घेतली. मात्र आजपर्यंत ही रक्कम बिल्डरकडे जमा झाली नाही. त्यामुळे साळुंके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोळंके यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणातील आरोपी श्रीकांत त्र्यंबक पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी श्रीकांत पाटील दोघेही राहणार डीघी, यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro:पुण्याच्या पती-पत्नीने घर घेऊन देण्याच्या बहाण्याने जालन्यातील सरकारी कर्मचाऱ्याला साडेसतरा लाखाला गंडा घातला. या रकमेची वारंवार मागणी करूनही ती मिळत नसल्यामुळे शेवटी कदीम जालना पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body:येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सुनील त्र्यंबकराव साळुंके यांनी त्यांच्या पुणे येथील डिघीभागात राहणाऱ्या श्रीकांत त्र्यंबक पाटील या नातेवाईकांच्या मध्यस्थीने पुणे येथीलच श्री गुलेरिया एस्टर रेसिडेन्सीमध्ये एक वन बीएचके फ्लॅट पाहून 45 लाख 50 हजार रुपयात किंमतही ठरवली . या घराच्या खरेदीसाठी पुणे येथील पंजाब नॅशनल बँक शाखा खराडी येथून 20 लाखाचे कर्ज घेतले होते. ती रक्कम गुलेरिया इस्टर रेसिडेन्सी यांच्या नावे जमा करण्यात आली होती. उर्वरित राहिलेली रक्कम ही जालना येथून साळुंखे यांच्या भविष्य निर्वाह निधी व घरबांधणीची अग्रीम रक्कम घेऊन त्यांच्या वेतन खात्यातून साडेआठ लाख रुपये श्रीकांत त्र्यंबक पाटील यांच्या सांगण्यावरून दिनांक 22 मे 2017 दिनांक 17 जून 2017 हे आणि सहा जुलै 2017 या तारखे नुसार हे साडे आठ लाख रुपये त्र्यंबक पाटील यांचे सांगण्यावरून जमा केलेले होते. उर्वरित साडेसतरा लाख रुपये हे त्र्यंबक सोळंके यांनी त्यांची पत्नी आणि मुलासह तसेच त्यांचे नगर येथील पाहुणे सारंग मुरलीधर पाटील यांच्यासह जाऊन त्र्यंबक पाटील यांच्या पुणे येथील दिघे या घरी दिनांक 20 डिसेंबर 2017 रोजी संबंधित बिल्डरला देण्यासाठी रोख रक्कम देऊन आले.त्यानंतर साळुंखे यांनी बिल्डर ला फोन करून संबंधित रक्कम मिळाली का ?अशी विचारणा केली मात्र ही रक्कम जमा झाले नसल्याचे बिल्डरने सांगितले .त्यानंतर पाटील यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले .आणि सदरील रक्कम मी माझ्या वैयक्तिक कामासाठी खर्च केलीआहे, ती लवकरच बिल्डर कडे जमा करतो असे सांगून वेळ धकवून नेली.मात्र सदरील रक्कम बिल्डर कडे न जमा झाल्याने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी श्रीकांत त्र्यंबक पाटील यांच्याकडून ही रक्कम दिनांक 31 डिसेंबर 18पर्यंत बिल्डरला देण्यात येईल येईल अशा पद्धतीची नोटरी जालना येथे करून घेतली .मात्र आज पर्यंत सदरील रक्कम बिल्डर कडे जमा झाली नाही. त्यामुळे सोळंके यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .याप्रकरणी सोळंके यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणातील आरोपी श्रीकांत त्र्यंबक पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी श्रीकांत पाटील दोघेही राहणार डीघी ,यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .मात्र अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.