ETV Bharat / state

रोजगार हमीतील रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतापले; थेट स्थायी समितीची बैठकच गाठली - Irrigation wells

मंठा तालुक्यातील मौजे वाई या गावाच्या १५ शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीची कामे पूर्ण केली होती. कामानुसार लाभार्थ्यांना ५० ते ६० हजार रुपये देखील रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळाले. मात्र, अद्याप त्यांना उर्वरित रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेठ जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या स्थायी समितीची बैठकच गाठली.

रोजगार हमीतील उर्वरित रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतापले
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:24 PM IST

जालना - मंठा तालुक्यात रोजगार हमी योजनेतून विहिरींची कामे झाली होती. मात्र, या कामासाठी मिळणारे अनुदान रखडले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी चपला झिजवल्या. मात्र, त्याचा फायदा झाला नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या स्थायी समितीची बैठकच गाठली.

रोजगार हमीतील उर्वरित रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतापले

तालुक्यातील मौजे वाई या गावाच्या १५ शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीची कामे पूर्ण केली होती. जून २०१७ मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. या विहिरींची कामे डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण झाली. त्या कामानुसार लाभार्थ्यांना ५० ते ६० हजार रुपये देखील रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळाले. मात्र, अद्याप त्यांना उर्वरित रक्कम मिळाली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन वर्षे मंठा पंचायत समितीमध्ये चकरा मारल्या. मात्र, त्यानंतरसुद्धा अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज जिल्हा परिषद गाठली. तसेच तेथे सुरू असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी १९ तारखेपर्यंत तुमचे काम होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे.

Intro:रोजगार हमी योजनेतून विहिरीच्या कामासाठी मिळणारे अनुदान रखडल्याने मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून शासन दरबारी चपला झीजवल्यानंतर त्यांच्या संयमाचा बांध फुटला, आणि थेट जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दाखल झाले.

Body:मंठा तालुक्यातील मौजे वाई या गावच्या 15 शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे पूर्ण केले आहेत. मात्र त्यांना अद्याप पर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे दोन वर्ष सरकार दरबारी चकरा मारूनही हे अनुदान न मिळाल्याने या पंधरा शेतकऱ्यांनी आज जिल्हा परिषद गाठली. आणि सुरू असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला. मौजे वाई येथील 15 लाभार्थ्यांना जून 2017 मध्ये सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या या विहिरींची कामे ही डिसेंबर 2017 मध्ये पूर्ण झाली. त्या कामानुसार पन्नास ते साठ हजार रुपये देखील या लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या माध्यमातून मिळाले. आहेत मात्र उर्वरित रक्कम मिळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हे लाभार्थी मंठा पंचायत समितीमध्ये उर्वरित अनुदानासाठी चकरा मारत होते ,मात्र त्यांना अनुदान न मिळाल्याने त्यांनी आज जिल्हा परिषद गाठली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी 19 तारखेपर्यंत आंदोलन करू नये त्यानंतर तुमचे काम होईल, असे आश्वासन दिल्यामुळे दिनांक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाभार्थ्यांच्या उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे.
आज जिल्हा परिषदेमध्ये हे आलेल्या लाभार्थ्यांमध्ये दिलीप उबाळे, सखाराम चौंडे ,शिवाजी मंडपे ,गणेश उबाळे ,बाबासाहेब शिंदे , अरुण उबाळे ,आदींचा समावेश होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.