ETV Bharat / state

जालना: ट्रकची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा मृत्यू - ट्रक दुचाकी अपघात न्यूज

ट्रकने दुचाकीला धड दिल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. जालना तालुका पोलिसांनी तंत्रज्ञाच्या मदतीने बनावट किल्लीने ट्रक ठाण्यात आणल्याची माहिती उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी दिली.

Dinesh Ubale
दिनेश नारायण उबाळे
author img

By

Published : Mar 18, 2021, 10:26 PM IST

जालना - दुचाकीवरून जालन्याहून गावाकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना १७ मार्चला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास देऊळगावराजा रोडवरील गोंदेगाव पाटीजवळ घडली. दिनेश नारायण उबाळे (३३, नंदापूर ता. जालना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. जालना तालुका पोलिसांनी तंत्रज्ञाच्या मदतीने बनावट किल्लीने ट्रक ठाण्यात आणल्याची माहिती उपनिरीक्षक संभाजी वडते यांनी दिली.

हेही वाचा-लशीचे दुष्परिणाम झाल्यास आरोग्य विमा योजनेतून उपचार शक्य-आयआरडीएआय

खिशातील पाकीट व कागदपत्रानुसार पटली ओळख-
नंदापूर या गावातील दिनेश उबाळे हे जालन्यातील काम आटोपून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन नंदापूरकडे जात होते. दरम्यान, वाघ्रुळ जवळील गोंदेगाव पाटी जवळ ते आले असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघात दुचाकीही खाली पडली होती. परिसरातील नागरिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या खिशातील पाकीट व मिळालेल्या कागदपत्रानुसार तात्काळ उबाळे यांच्या घरी व नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा-सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण; गुंतवणुकदारांना ८ लाख कोटींचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.