जालना : सर्वत्रच मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका, तूर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीदासारख्या पिकांना शेतात साचलेल्या पाण्यातच कोंब फुटले. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू आहे. त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी योगेश गायके यांचं 'शेतकरी रडला' हे नवीन एक गाणं रिलीज झालं आहे.
प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकेल असं हे गाणं आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या गाण्याला लाखो लाईक्स मिळत आहेत. शेतकरी जगवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे, असं आवाहन पोलीस गायक योगेश गायके यांनी केलंय.
गाण्याची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे गाणं ऐकू शकता. https://www.youtube.com/embed/jdtSNwtl4-U
हेही वाचा - अरबी समुद्रात क्रूझवर हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; एनसीबीच्या धाडीत अमली पदार्थांसह 13 जण ताब्यात