ETV Bharat / state

पेरजापूरच्या शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिले कारण - भोकरदन तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देविदास तळेकर यांचा रिक्षा व्यवसाय बंद होता. तळेकर यांना एक एकर जमीन असून गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. कर्जाच्या धास्तीमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Devidas Talekar
देविदास तळेकर
author img

By

Published : Aug 6, 2020, 3:43 PM IST

जालना - भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथील देविदास भगवान तळेकर (वय 40) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तळेकर यांनी विविध बँकांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जांच्या धास्तीपोटी मंगळवारी दुपारी शेतामध्ये विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे कर्जामुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

शेतकरी देविदास तळेकर हे पॅसेंजर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा रिक्षा व्यवसायदेखील बंद होता. तळेकर यांना एक एकर जमीन असून गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले आणि सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. सायंकाळी देविदास तळेकर यांची पत्नी व मुलगा योगेश घरी आल्यानंतर सात वाजेपर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र,रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत.

बर्‍याच वेळानंतर गावातील काही तरुण तळेकर यांना शोधण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गेले. शेतामध्ये झाडाखाली तळेकर मृतावस्थेत आढळले. तळेकर यांनी विष घेतले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या तरुणांनी तत्काळ गावामध्ये कळवून घटनेची माहिती दिली. यानंतर तळेकर यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

विशेष बाब म्हणजे तळेकर यांनी चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, महिंद्रा फायनान्स तसेच अन्नपूर्णा फायनान्स यांचेकडून कर्ज घेतले होते. पाच लाख वीस हजार रुपये कर्ज घेतले असल्याचे तळेकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करुन त्यांच्यावर पेरजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.