ETV Bharat / state

उद्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अठरावे राज्यस्तरीय संमेलन - ABVP

जेईएस महाविद्यालयासमोर असलेल्या अग्रेशन फाऊंडेशन येथे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी'मध्ये हे संमेलन सुरू होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी अभाविपतर्फे गांधी चमन येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.

ग्रंथ दिंडी
ग्रंथ दिंडी
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:08 PM IST

जालना - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 'प्रतिभा संगम' हे 18 वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन उद्या (1 फेब्रुवारी) पासून शहरात सुरू होत आहे. तत्पूर्वी आज सकाळी अभाविपतर्फे गांधी चमन येथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती.

उद्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अठरावे राज्यस्तरीय संमेलन

जेईएस महाविद्यालयासमोर असलेल्या अग्रेशन फाऊंडेशन येथे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी'मध्ये हे संमेलन सुरू होणार आहे. आज पार पडलेल्या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन उद्योजक समीर अग्रवाल व नगराध्यक्ष सौ .संगीता गोरंट्याल यांच्यासह या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचे निमंत्रक प्रा. सुनील कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदींच्या उपस्थितीत पार पडले. झाले. या ग्रंथ दिंडीत पालखीमध्ये भारताचे संविधान, श्रीमद भगवद्गीता, दासबोध आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते.

Intro:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने "प्रतिभा संगम" हे 18 वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन उद्या दिनांक 1 फेब्रुवारी पासून जालन्यात सुरू होत आहे .तत्पूर्वी आज दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी गांधी चमन येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

Body:जे .ई.एस महाविद्यालय समोर असलेल्या अग्रेशन फाऊंडेशन येथे 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी' मध्ये हे विद्यार्थी साहित्य संमेलन सुरू होणार आहे. आज या ग्रंथदिंडीचे उद्घाटन उद्योजक समीर अग्रवाल नगराध्यक्ष सौ .संगीता गोरंट्याल यांच्यासह या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचे निमंत्रक प्रा. सुनील कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, स्वागत समिती अध्यक्ष शिवरतन मुंदडा, सचिव सुरेश केसापूरकर, उद्योजक धनशाम शेठ गोयल ,सुनील रायठठ्ठा ,कुमार देशपांडे ,विजय देशमुख ,आदींच्या उपस्थितीमध्ये झाले. उद्या दिनांक 1 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे .दहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे .दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रदर्शनी ,गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखत ,यांचा समावेश आहे. उद्घाटनासाठी अक्षयकुमार काळे तर प्रमुख उपस्थिती मध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष सौ .संगीता गोरंट्याल ,रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.स्मिता लेले ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्निल . प्रदेशाध्यक्ष प्रा सारंग जोशी ,यांची उपस्थिती राहणार आहे . आज निघालेल्या ग्रंथ दिंडी मध्ये पालखीमध्ये भारताचे संविधान, श्रीमद्भगवद्गीता, दासबोध, आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते .सनई चौघडा च्या आवाजात आणि लेझीमच्या तालावर ही ग्रंथ दिंडी शिवाजी पुतळा येथे विसर्जित झाली .दरम्यान काही ठिकाणी या ग्रंथ दिंडी वर पुष्पवर्षाव करण्यात आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.