ETV Bharat / state

निकृष्ट दर्जामुळे बाबुलताराच्या ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पाडले बंद

जोपर्यंत गावकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू न करून देण्याचे निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. रस्त्यावरील वाहतूक अजून सुरवातही झाली नाही, तरीदेखील जागोजागी रस्ता उखडला आहे. यामधून चार चाकी वाहने चालवताना खडीमुळे वाहने घसरत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या रस्त्याचे काम बंद पाडले आहे.

निकृष्ट दर्जामुळे बाबुलताराच्या ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पाडले बंद
author img

By

Published : Apr 26, 2019, 10:55 AM IST

जालना - जितूर औरंगाबाद महामार्गापासून चार किलोमीटर आत असलेल्या बाबुलतारा या गावात रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे गावकऱ्यांनी हे काम बंद पाडले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या गावात ४ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू होते.

निकृष्ट दर्जामुळे बाबुलताराच्या ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पाडले बंद

परतूर पासून सात किलोमीटर असलेल्या या गावाला येण्यासाठी दुधना नदी ओलांडावी लागते. त्यामुळे पावसाळ्यात जवळपास हा रस्ता बंदच असतो. बाबुलतारा गावकऱ्यांना जिंतूर औरंगाबाद या मार्गाचाच वापर करावा लागतो. यामुळे हा रस्ता गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या कामाला ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन महिन्यापूर्वी सुरुवात झाली. रस्त्याचे कामही झाले. मात्र, या कामांमधील निकृष्ट दर्जामुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उखडायला लागला आणि खडी अस्तव्यस्त पसरायला सुरुवात झाली आहे.

यासंदर्भात गावकऱ्यांनी चार दिवसापूर्वी संबंधित कामाचे ठेकेदार आणि कनिष्ठ अभियंता यांना सूचना दिल्या. मात्र, त्याने काहीच फरक पडला नाही. यामुळे गावकऱ्यांनी 23 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता परतूर दौऱ्यावर आले असता त्यांना निवेदन दिले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उखडलेल्या ठिकाणी दुरुस्ती करून देऊ असे सांगितले मात्र, तसे केल्याने हा रस्ता टिकणार नाही. रस्त्यावरील बैल गाड्यांची वर्दळ लक्षात घेता हा पूर्ण रस्ता गुणवत्तापूर्ण तयार करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

जोपर्यंत गावकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू न करून देण्याचे निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. रस्त्यावरील वाहतूक अजून सुरवातही झाली नाही, तरीदेखील जागोजागी रस्ता उखडला आहे. यामधून चार चाकी वाहने चालवताना खडीमुळे वाहने घसरत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या रस्त्याचे काम बंद पाडले आहे. गावकऱ्यांमध्ये भारत पंडित, अरुण काळे, राजाभाऊ मुळे, आसाराम देवकर, रामदास मुळे, रामप्रसाद काळे, विजय गायकवाड, श्रीराम वाघमारे, आदींचा समावेश आहे.

Intro:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चार किलोमीटर झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे गावकऱ्यांनी संबंधित काम बंद पाडले. हा प्रकार परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे घडला. जिंतूर औरंगाबाद महामार्गापासून पासून चार किलोमीटर आत मध्ये असलेल्या बाबुलतारा या सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या गावचा रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे ावकर्‍यांनी हे काम बंद पाडले आहे.

Body:परतूर पासून सात किलोमीटर असलेल्या या गावाला येण्यासाठी दुधना नदी ओलांडावी लागते त्यामुळे पावसाळ्यात जवळपास हा रस्ता बंदच असतो .बाबुलतारा गावकऱ्यांना जिंतूर औरंगाबाद या मार्गाचाच वापर करावा लागतो .त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असलेला गावकऱ्यांसाठीचा हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन महिन्यापूर्वी कामाला सुरुवात केली ,आणि पाहता पाहता रस्त्याचे कामही झाले. मात्र या कामांमधील निकृष्ट दर्जामुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उघडायला लागला आहे. आणि खडी ही पसरायला सुरुवात झाली आहे .यासंदर्भात गावकऱ्यांनी चार दिवसापूर्वी संबंधित कामाचे गुत्तेदार आणि कनिष्ठ अभियंता यांना सूचना दिल्या मात्र त्याने काहीच फरक पडला नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी दिनांक 23 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे परतूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी गावकऱ्यांनी जाऊन त्यांनाही निवेदन दिले. त्यानंतर संबंधित गुत्तेदाराने आणि कनिष्ठ अभियंत्यांनी उखडलेल्या ठिकाणी दुरुस्ती करून देऊ असे सांगितले मात्र, मात्र तसे केल्याने हा रस्ता टिकणार नाही या रस्त्यावरील बैल गाड्यांची वर्दळ लक्षात घेता हा पूर्ण रस्ता गुणवत्तापूर्ण तयार करावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे .आणि जोपर्यंत गावकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू न करून देण्याचे निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. रस्त्यावरील वाहतूक अजून सुरवातही झाली नाही तरीदेखील जागोजागी रस्ता उखडला आहे, नुसता उखडलाच आहे नाहीतर यामधून चार चाकी वाहने चालवताना नाही ही खडीमुळे ती स्लिप होत आहेत .त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन या रस्त्याचे काम बंद पाडले आहे. गावकऱ्यांमध्ये भारत पंडित, अरुण काळे ,राजाभाऊ मुळे ,आसाराम देवकर ,रामदास मुळे, रामप्रसाद काळे ,विजय गायकवाड ,श्रीराम वाघमारे, आदींचा समावेश आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.