जालना - पैठण येथे रस्त्याच्या खोदकामामुळे जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. शनिवारी पैठण येथून एक किलोमीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू आहे. या कामाच्या खोदकामामुळे जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे.
हेही वाचा - सामान्यांच्या रुग्णालयात नेत्यांसाठी पायघड्या; मात्र, रुग्णांसाठी मरण यातना
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयामध्ये भरपूर पाणी आहे. मात्र, वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनी मुळे जालनेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शनिवारी पैठण येथून एक किलोमीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे आणि पुलाचे काम सुरू आहे. या कामाच्या खोदकामामुळे जालना शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे.
ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने कामही सुरू झाले आहे. मात्र, ती दुरुस्त करून जालना शहरातील जलकुंभ भरण्यासाठी चार ते सहा दिवसांचा विलंब होणार आहे. पर्यायाने जालनेकरांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडून प्रसिद्धीपत्रक काढून चार दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे कळविले आहे. तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.