जालना - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जालना येथे नव्याने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या सेंटरमध्ये असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.
हेही वाचा - '18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस मिळावी, हा राज्य शासनाचा प्रयत्न'
नवीन जालना भागामध्ये जे.ई. एस महाविद्यालयाच्या समोर अग्रसेन फाउंडेशनची इमारत आहे. या इमारतीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने 110 खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही या सेंटरला भेट देऊन येथे उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेतली आणि जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, डॉक्टर संजय जगताप, महाराजा अग्रसेन फाउंडेशनचे डॉ. रामलाल अग्रवाल सतीश तवरावाला, अरुण अग्रवाल, आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा - स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखतेय - खासदार दानवे