ETV Bharat / state

..यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा नाही, शेतकरी हतबल

अवकाळी पावसाने केळीच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पीकाला विमा संरक्षण नसल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट आले आहे.

crop insurance will not be available
अवकाळी पावसाने केळीच्या शेतीचे प्रचंड नुकसान
author img

By

Published : May 12, 2020, 2:50 PM IST

जालना ( बदनापूर ) : पंतप्रधान विमा योजनेतंर्गत तालुक्यातील केळी पीकाला तालुक्यात निकषांतर्गत समावेश झालेला नाही. त्यामुळे विमा स्वीकारला गेलेला नाही. तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना गारपीटीनंतर विमा मिळणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अवकाळी पावसामुळे केळीच्या शेतीचे नुकसान

बदनापूर तालुक्यात रविवारी दुपारी 3 नंतर जोरदार वाऱ्यासह गारपीटी व वादळी पाऊस पडल्यामुळे प्रचंड प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यातील खरबूज, टरबूज, अंबा, मोसंबी, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी नैसर्गिक असमतोल वातावरणामुळे पंतप्रधान विमा योजनेतंर्गत विमा भरतात. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत झालेले नुकसान विमा कंपनी शेतकऱ्यांना देत असते. त्या अनुषंगाने तालुक्यातील मोसंबी, अंबा आदी उत्पादकांनी फळविमा घेतला होता. परंतु तालुक्यात केळी पिक हे निकषात बसत नसल्यामुळे फळपीक विमा भरता आला नव्हता.

अवकाळी पावसामुळे केळीच्या शेतीचे नुकसान

बदनापूर तालुक्यात वातावरण पोषक असल्यामुळे केळी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. तालुक्यातील गोकुळवाडी येथील प्रगतशील शेतकरी अनिल दादाराव कोलते हे मागील तीन ते चार वर्षांपासून केळी हे पीक घेतात. त्यांनी सांगितले की, बदनापूर तालुक्यातील हवामान व वातावरण केळी पिकाला पोषक असल्यामुळे मी केळी लागवड केलेली आहे. पहिले दोन वर्ष मला या पिकाबाबत जास्त अनुभव नसल्यामुळे मी जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून पीक घेतले. त्यामुळे त्या जिल्हयाच्या मानाने उत्पादनात थोडी घट येत होती. परंतु यंदा मात्र केळी पीक अतीशय चांगले आले होते. केळीचे घडही मोठया प्रमाणात आलेले हेाते. येत्या आठवडा पंधरवाडयात हे पीक काढणीस आले असते. परंतु रविवारी जोरदार वारे व गारपीटीमुळे उभी केळीचे झाडे पडले. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वर्षभराची मेहनत वाया जाण्याची परिस्थिती आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत आम्ही प्रत्येक पिकाचा विमा उतरवत असतो परंतु बदनापूर तालुक्यात केळी पीक हे निकषात न बसल्यामुळे विमा कंपन्यांनी विमा भरूनच घेतलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले.

तालुक्यात केळी पीक चांगले येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा लावलेल्या आहेत. परंतु विमा उतरवलेला नसल्यामुळे कालच्या गारपीटीत झालेले नुकसान भरून येणार नसल्याचे दिसून येत आहे.दरम्यान रविवार पडलेल्या जोरदार वादळामुळे व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आ. नारायण कुचे, तहसीलदार संतोष बनकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी गोकूळवाडी, सोमठाणा, कंडारी, मालेवाडी आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन केली या वेळी गळ झालेल्या बागा, जोरदार वाऱ्यामुळे पडलेले झाडे व पडझड झालेली घरे व उडालेल्या पत्रांमुळे रविवारी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.

या गारपिटीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे आ. कुचे यांनी तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, तलाठी आदींना सूचना करून ताबडतोब शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे तसेच इतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले असून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत ‍मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.