ETV Bharat / state

Jalna Crime : क्रिप्टो करंसी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 4 जणांना घेतले ताब्यात

क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवणूक करून गुंतविलेल्या रक्कमेच्या ११ टक्के दरमहा मिळून करंसी लॉन्च झाल्यानंतर त्याची भारतीय रुपयाच्या तुलनेत अनेक पटीने परतावा मिळून देतो, असे आमीष देऊन आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर त्याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

Pune Crime
क्रिप्टो करंसी
author img

By

Published : Feb 3, 2023, 8:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 10:21 PM IST

जालना : ऋषीकेश शेषराव काळे (रा. जुना जालना, ता. जि. जालना) यांच्या फियादीवरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अद्यापपर्यंत ११६ लोकांची एकूण २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्हा तांत्रिक दृष्टया अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपींचे शोधकाम सुरू करण्यात आले. गुन्हयात वापरण्यात आलेली बनावट वेबसाईट बनवून त्याचा गैरवापर होत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्यातील वेबसाईट वापरणारे आरोपी हे पुणे आणि इचलकरंजी (ता. जि. कोल्हापूर), महाराष्ट्र, गुजरात राज्यातील असल्याची खात्री झाली. यानंतर माहितीच्या आधारे २ तपास पथके पुणे येथे रवाना करण्यात आले होते. या तपास पथकाने आरोपी गुन्हा करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून वेगवेगळया ठिकाणाहून ०४ इसमांना ताब्यात घेतले. आरोपीच्या घराची झडती घेऊन चौकशी केली असता गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.

4 आरोपींना अटक : झडती दरम्यान आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेले ०३ लॅपटॉप, ०३ संगणक आणि ०९ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींची फसवणूक केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेल्या महागड्या गाड्या (चारचाकी वाहने) जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किं. २,४४,००,०००/- आहे. गुन्हयात आरोपींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विविध बँक खात्यामध्ये एकूण ३,४४,००,०००/- रुपये गोठविण्यात आले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये ०४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

या पोलिसांमुळे प्रकरणाचा छडा : ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, प्र. पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा बी. डी. फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर पायघन, सपोनि संभाजी वडते, फुलसिंग गुसिंगे, मंगला लोणकर, अंमलदार श्रीकुमार आडेप, ज्ञानेश्वर खराडे, सागर बाविस्कर, संभाजी तनपुरे, गोपाल गोसिक, धीरज भोसले आर्थिक गुन्हे शाखा जालना यांनी केली. पुढील तपास सपोनि. ज्ञानेश्वर पायघन करीत आहे.

सोलापूरातील 'या' घटनेची चर्चा : क्रिप्टोकरन्सीच्या या आभासी चलनाचे आमीश दाखवून हजारो सोलापूरकरांना ऑक्टोबर, 2022 रोजी कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला होता. दोन महिन्यांपासून सोलापुरातील नागरिक डॉलर दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवणूक करत होते. या दामदुप्पट डॉलर योजनांच्या आमिषाला बळी पडून सोलापूरकरांना चांगलाच चुना लावण्यात आला होता. सोलापुरातील 'सीसीएच' (क्लाऊड मायनर अ‍ॅप) या अमेरिकन अ‍ॅपमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक करण्यात आली होती. पण गेल्या चार दिवसांपासून सीसीएच अ‍ॅपवर डॉलर निघत नाही. तसेच मॅक्स क्रिप्टो या अ‍ॅपमधून डॉलर काढणे दहा दिवसांपासून अचानकपणे बंद झाले होते. यामुळे गुंतवणूकदारांची धांदल उडाली होती. मंगळवारी दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुंतवणूकदारांची फिर्याद देण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

हेही वाचा : Delhi Kajhawala Case: कांजवाला प्रकरण.. अपघाताच्यावेळी अंजली होती नशेत.. व्हिसेरा अहवालातून सत्य आलं समोर

Last Updated : Feb 3, 2023, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.