जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या १० दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे काढणी झालेले मक्याचे कणसे पाण्यावर तरंगू लागले आहेत. ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पाऊस वेळेवर पडला नाही. त्यानंतर थोडाफार पाऊस आला. त्यानंतर मात्र पावसाने दांडी मारली. त्यामुळे आता पिके येणार की नाही? अशी चिंता शेतकऱ्याला लागली होती. मात्र, १५ दिवसानंतर पुन्हा पाऊस आला आणि मक्याचे चांगले पिक आले. कणसे देखील भरली. शेतकऱ्याने पिकाची काढणी देखील केली. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घातले आहेत. त्यामुळे मक्याचे कणसे पाण्यावर तरंगत आहेत, तर कापसाची बोंडे तुटले आहेत. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.