जालना - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. मात्र, त्यासोबत दुसरी एक दिलासादायक बाब अशी आहे की, बरे होणाऱ्या रुग्णांचाही आकडा वाढत आहे. हा आकडा आत्ता 149 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 ने वाढली आहे. एकूण संख्या आता 267 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सहा एप्रिलला पहिली कोरोनाबाधित महिला आढळली होती. त्यानंतर हा आकडा वाढत जात 267 वर पोहोचला आहे. आता राज्य राखीव पोलीस बलाचे चार जवान, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील कादराबाद परिसरातील चार जण आणि बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील चार जण अशा एकूण 12 रुग्णांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 74 रुग्ण येथील कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या आजही सुरू असल्याने या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.