ETV Bharat / state

जालना जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामध्ये साठवणार लस

आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथून ही लस जालना येथे येणार आहे. येथील औषध भांडारामध्ये आल्यानंतर जालना जिल्ह्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

author img

By

Published : Jan 12, 2021, 7:24 PM IST

जालना
जालना

जालना - जिल्ह्यामध्ये 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यानुसार आरोग्य प्रशासन तयारीला लागले आहे. जालना जिल्ह्यात येणारी लस किती असणार? कुठे साठवणार? कोणाला देणार? याविषयी आता उत्सुकता वाढली आहे.

जालना

प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीला सकाळीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत लस जालन्यात पोहोचलेली नाही. ती कधी पोहोचणार? कशी पोहोचणार? याविषयी देखील प्रशासनाला सूचना आलेल्या नाहीत. मात्र, आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. आलेली लस ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामधील शीतगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.

12 हजार 533 आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस

आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथून ही लस जालना येथे येणार आहे. येथील औषध भांडारामध्ये आल्यानंतर जालना जिल्ह्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व आरोग्य कर्मचारी आणि शासकीय आरोग्‍य अधिकारी खासगी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक तेथील कर्मचारी रुग्णवाहिकेचे सर्व चालक, ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस या सर्वांना पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे. 12 हजार 533 आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोविड अ‌ॅपमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे, त्यानुसार हे लसीकरण होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.