ETV Bharat / state

लोकसभेसाठी काँग्रेसकडून विलास औताडे; बच्चू कडू ही करणार भूमिका स्पष्ट

काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांना पक्षाने खासदार रावसाहेब दानवेंच्या विरोधात टक्कर देण्यासाठी उभे केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत देखील या दोघांनी समोरासमोर टक्कर दिली होती

लोकसभेसाठी काँग्रेसकडून विलास औताडेंना उमेदवारी
author img

By

Published : Mar 23, 2019, 12:26 PM IST

जालना - लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. भाजपाच्यावतीने विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांना तगडा उमेदवार कोण द्यायचा याविषयी सर्वच पक्षात चर्चा सुरू झाली. आता शेवटच्या टप्प्यात जालना लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विलास औताडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे देखील आज जालन्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांना पक्षाने खासदार रावसाहेब दानवेंच्या विरोधात टक्कर देण्यासाठी उभे केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत देखील या दोघांनी समोरासमोर टक्कर दिली होती. मात्र, मोदी लाटेमध्ये विलास विलास औताडे यांचा निभाव लागला नाही. मागील ५ वर्षात भाजपने केलेली कामे त्याचसोबत भाजपवर झालेल्या विविध प्रकारच्या आरोपांमुळे रावसाहेब दानवे हे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाकडे वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याशिवाय ठोस मुद्दे नसल्यामुळे यावेळी देखील विलास औताडे यांना रावसाहेब दानवे यांच्याशी टक्कर देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

यावेळेस आणखी एक अडचणीची बाब काँग्रेससाठी ठरणार आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी. डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांना या पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या मतांवर निश्चित परिणाम होईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे. अपंगांच्या गळ्यातील ताईत म्हणून सर्व परिचित असलेले प्रहार अपंग संघटनेचे बच्चू कडू हे देखील जालन्यातून शेतकऱ्यांना "साला" म्हणणाऱ्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. मात्र, विदर्भातील बच्चू कडूंचा जालन्यातील प्रस्थापितांविरुद्ध किती निभाव लागेल, हे थोड्याच दिवसांत समोर येईल. लोकसभेविषयी आपली भूमिका बच्चू कडू आज घेणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट करणार आहेत.

Intro:जालना लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे .भाजपाच्या वतीने विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर त्यांना तगडा उमेदवार कोण द्यायचा याविषयी सर्वच पक्षात खलबते सुरू झाली . निवडणुकीची घटका भरत आली असली तरी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. परंतु आता शेवटच्या टप्प्यात जालना लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विलास अवताडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे देखील आज जालन्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत

Body:काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष विलास आवताडे यांना पक्षाने खासदार रावसाहेब दानवे च्या विरोधात टक्कर देण्यासाठी उभे केले आहे. 2014 च्या निवडणुकीत देखील या दोघांनी समोरासमोर टक्कर दिली होती मात्र मोदी लाटेमध्ये विलास आवताडे यांचा निभाव लागला नाही .मागील पाच वर्षात भाजपाने केलेली कामे त्याच सोबत भाजपा वर झालेल्या विविध प्रकारच्या आरोपांमुळे रावसाहेब दानवे हे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र काँग्रेस पक्षाकडे वैयक्तिक टिका टिपणी करण्याशिवाय ठोस मुद्दे नसल्यामुळे यावेळीदेखील विलास आवताडे यांना रावसाहेब दानवे यांच्याशी टक्कर देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सोबत यावेळेस आणखी एक अडचणीची बाब काँग्रेससाठी ठरणार आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी. डॉक्टर शरदच्चंद्र वानखेडे यांना या पक्षातर्फे उमेदवारी दिल्यास देण्यात आले. धनगर ,मुस्लिम,दलित, या प्रमुख घटकांसह अन्य छोटे-मोठे घटकही वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांवर निश्चित परिणाम होईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
अपंगाच्या गळ्यातील ताईत म्हणून सर्व परिचित असलेले प्रहार अपंग संघटनेचे बच्चू कडू हे देखील जालन्यातूनशेतकऱ्यांना" साला" म्हणणाऱ्या च्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत .मात्र विदर्भातील बच्चू कडूंची जालन्यातील प्रस्थापितांविरुद्ध किती निभाव लागेल हे थोड्या दिवसात करणार आहे. लोकसभे विषयी आपली भूमिका बच्चू कडू हे आज शनिवारी घेणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट करणार आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.