जालना - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा शनिवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा काँग्रेसच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून 2024मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यात आला.
केंद्र सरकारचा निषेध -
जालना शहरातील अंबड चौफुली येथे शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी जमा झाले. यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केंद्रातील भाजप सरकारने दरवाढ केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यांचा निषेध नोंदविला आणि तेलाशिवाय केलेले अन्नपदार्थ इथे घेऊन आल्या होत्या.
हेही वाचा - वयोवृद्ध कैद्यांच्या सुटकेसाठी मेधा पाटकर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधी यांना 2024च्या निवडणुकीत पंतप्रधान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमुद, फकीरा वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.