ETV Bharat / state

CM Uddhav Thackeray : आरोप करणाऱ्यांनी कोरोनाकाळातला भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवावा; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जालना

कोरोनामध्ये राज्य सरकारने भ्रष्टाचार केला (Corruption in Corona Pandemic) असा आरोप करणाऱ्यांना पोटदुखी आणि मळमळ होत आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने कोरोना काळात चांगले उपचार करून रुग्णांना मृत्यूपासून वाचवले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 12, 2022, 4:12 PM IST

Updated : Feb 12, 2022, 6:19 PM IST

जालना - कोरोनामध्ये राज्य सरकारने भ्रष्टाचार केला (Corruption in Corona Pandemic) असा आरोप करणाऱ्यांना पोटदुखी आणि मळमळ होत आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने कोरोना काळात चांगले उपचार करून रुग्णांना मृत्यूपासून वाचवले आहे. पण, काही जणांना राज्य सरकारचे कौतुक परवडत नाही. त्यामुळे त्यांना पोटदुखी आणि मळमळ होत असून, त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे
  • आरोप करणाऱ्यांनी भ्रष्टाचार काढून दाखवावा - मुख्यमंत्री ठाकरे

आरोप करणाऱ्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवावा. तसेच स्वतःचा आरोग्य केंद्रात सरकारी दराने उपचार करून घ्यावा किंवा आम्ही फुकट करुन देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यांचा इलाज करणे हे सरकारचे कर्तव्यदेखील आहे, असा टोलाही ठाकरे यांनी नाव न घेता भाजपला लगावला आहे.

जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नुतन वास्तूचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, मंत्री अदिती तटकरे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

  • थपडा देणे आणि थपडा खाणे हे आमचे आयुष्य - मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. कुणी माझे कौतुक केले की मला धडधड होते असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलमान खानच्या दबंग चित्रपटातला सोनाक्षी सिन्हा यांचा 'थप्पड से डर नही लगता साहब प्यार से डर लगता है' हा डायलॉग देखील आठवला. पण हे कौतुक वेगळे असून, थपडा देणे आणि थपडा खाणे हे आमचे आयुष्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : Feb 12, 2022, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.