ETV Bharat / state

घृणास्पद..! वर्षभर 'तो' करत होता मुलीवर लैंगिक अत्याचार, आई देत होती नराधमाला साथ - partur police station

पित्यानेच स्वतःच्याच मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला माहित असतानाही तिने विरोध न करता पतील साथ दिल्याची घटना जालन्याच्या परतूर शहरात घडली.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:22 PM IST

Updated : Dec 12, 2019, 8:31 PM IST

जालना - पवित्र मानल्या जाणाऱ्या आई, बाप, मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जालन्याच्या परतूर शहरात घडली आहे. पित्यानेच स्वतःच्याच मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला माहित असतानाही तिने विरोध न करता पतीला साथ दिली. पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याने तिने थेट आझाद मैदान गाठत उपोषण केले. अखेर मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत जालन्यात वर्ग केला.

परतूर येथील 16 वर्षीय मुलीवर 2018 मध्ये तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केला होता. ती तक्रार करेल म्हणून तिला एका पत्रकाराकडे नेऊन तिची समजून घालण्यात आली. तेव्हा या पत्रकाराने देखील लग्न करतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेने तिच्या आईला आणि दोन मावश्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी तिघींनीही तिला मदत न करता उलट या मुलीनेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ नये म्हणून तिला ६ महिने डांबून ठेवले होते.

हेही वाचा - जालना : महिला पोलीस उपनिरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याप्रकणी गुन्हा दाखल

तरीही तिने ६ महिन्यांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दिली होती. या तक्रारीवरून तिची वैद्यकीय तपासणी करून अप्पर पोलीस अधीक्षकांनी परतूरच्या पोलीस निरीक्षकांना योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र, पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे या पीडितेने मुंबई गाठत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. त्यावेळी मुंबई पोलिसांची नजर या मुलीकडे गेली. मुंबई पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन सर्व प्रकार विचारला. तिने दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात पीडितेचे वडील, पत्रकार रशीद रजाक बागवान, पीडितेची आई आणि दोन मावश्या अशा एकूण 5 जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियम 3, 4, 7, 8 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - शुभ कल्याण मल्टीस्टेटचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, मैत्रेय चिटफंडचाही तपास वेगाने

Intro:जन्मदात्या पित्यानेच वर्षभर मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केले. हा सर्व प्रकार पीडितेच्या आईला माहित असतानाही तिने याला प्रतिबंध न करता आपल्या पतीला साथ दिली. त्यामुळे पीडितेने पित्याच्या अत्याचाराला कंटाळून पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातले. आणि पर्यायाने तिला मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसावे लागले याचा परिणाम मुंबई पोलिसांनी दखल घेऊन पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पीडितेचे वडील तिची आई व दोन मावश्या आणि एक पत्रकार अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तो जालन्यात वर्ग केला आहे.

Body:या प्रकरणातील पीडित मुलगी सोळा वर्षाची असून ती शाळेत शिक्षण घेते. सन 2018 मध्ये तिच्यावर तिच्या वडिलांनी पहिल्यांदा बलात्कार केला तेव्हा या मुलीने तक्रार देऊ नये म्हणून तिला परतूर येथीलच एका पत्रकाराकडे नेऊन समजूत घालण्यात आली . तेव्हा या पत्रकारांने देखील तिला झुलवत ठेवत मी तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणून तिचा विनयभंग केला. त्यानंतर या पीडितेने ही सर्व हकीकत तिची आई आणि दोन मावश्याना सांगितली त्यावेळी या तिघांनीही तिला मदत न करता उलट या मुलीनेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ नये म्हणून ६ महिने डांबून ठेवले होते. अशा परिस्थितीत देखील सहा महिन्यापूर्वी या मुलीने अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांची भेट घेऊन तक्रारही दिली होती. या तक्रारीवरून तिची वैद्यकीय तपासणी करून अप्पर पोलीस अधीक्षकांनी परतूरच्या पोलीस निरीक्षकांना योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे या पीडितेने मुंबई गाठली आणि आझाद मैदानावर उपोषण सुरू केले .याच वेळी मुंबई पोलिसांची नजर या मुलीकडे गेली आणि तिला विश्वासात घेऊन सर्व हकीकत विचारली . तिने दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिस ठाण्यात पीडितेचे वडील अमजद शेख, पत्रकार रशीद रजाक बागवान, पीडितेची आई आणि दोन मावश्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियम 3,4,7,8 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 12, 2019, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.