ETV Bharat / state

धुळे-सोलापूर महामार्गावर कारचा अपघात; १ ठार तर 4 गंभीर जखमी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वर आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

car accident on dhule solapur highway one dead one injured
धुळे-सोलापूर महामार्गावर कारचा अपघात; १ ठार तर १ गंभीर जखमी
author img

By

Published : Dec 12, 2020, 9:37 AM IST

Updated : Dec 12, 2020, 5:42 PM IST

जालना - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वर आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना वडीगोद्री येथील पेट्रोल पंप समोर झाली. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

औरंगाबाद येथील काही तरुण चार चाकी वाहनाने फिरण्यासाठी गेले होते. शनिवार पहाटे औरंगाबादकडे येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने होंडा सिटी क्र.एम.एच.सीयू 9786 या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात शीव अग्रवाल हा जागीच ठार झाला. तर मलिम खान, ओम अग्रवाल, मोहम्मद कैफ, कशितीत पाटील हे चौघे गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी घटनेसंदर्भात कळवताच, रुग्णवाहिका चालक आप्पासाहेब गाडेकर, महेश जाधव, विठ्ठल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी संदीपान काळे यांनी शीव अग्रवालला मृत घोषित केले. तर चार जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद गोंदी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. अपघातामध्ये होंडा सिटी कारचा पाठीमागील भाग हा संपूर्ण चुरा झाल्याचा दिसत आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

सविस्तर थोड्याच वेळात...

हेही वाचा - जालना जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारीला निवडणुका

हेही वाचा - मालमत्ता पत्रिकेवर बनावट स्वाक्षऱ्या; तक्रारीनंतरही पोलिसांची टाळाटाळ

Last Updated : Dec 12, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.