ETV Bharat / state

जालन्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ... 45 तोळे सोन्यासह रोकड लंपास - burglary in jalna

अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालून पंचेचाळीस तोळे सोने लुटल्याची घटना आज समोर आली. पहाटे चार वाजेच्या सुमारास दगडफेक करत शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी डाव साधला. यामध्ये 45 तोळे सोनं आणि 1 लाख 43 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

thief in jalna
जालन्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ... 45 तोळे सोन्यासह रोकड लंपास
author img

By

Published : Nov 19, 2020, 5:57 PM IST

जालना - अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालून पंचेचाळीस तोळे सोने लुटल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास समोर आली. पहाटे चार वाजेच्या सुमारास दगडफेक करत शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी डाव साधला. यामध्ये 45 तोळे सोनं आणि 1 लाख 43 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

श्रीमंत तुकाराम खटके यांचे वडीगोद्रीजवळील औरंगाबाद-बीड महामार्गानजीक घर आहे. दिवाळीसाठी त्यांच्याकडे दोन्ही मुली आल्या होत्या. यावेळी कुटुंबीय झोपलेले असतानाच दरोडेखोरांनी शेजारील घराचा कडी-कोयंडा लाऊन खटके यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी खटके कुटुंबीय जागे झाले. आरडाओरड सुरू झाला. मात्र या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी रोख रक्कम व दागिने लांबवले. त्यानंतर पळ काढत असताना चोरट्यांनी खटके कुटुंबीयांवर जोरदार दगडफेक केली.

चोरून नेलेल्या ऐवजामध्ये एक तोळे सोन्याचे दागिने, चाडेचार तोळ्यांचा राणीहार, साडेतीन तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा बांगड्या तसेच अन्य दागिन्यांसह एकूण 45 तोळ्यांचा ऐवज चोरट्यांनी साफ केला. तसेच एक लाख 43 हजार रुपयांची रोखही लंपास करण्यात आली.

पोलिसांची कसून तपासणी

प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक अप्पर पोलीस अधीक्षकांसह या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्यसोबत ठसे तज्ञ देखील होते. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.