ETV Bharat / state

भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातील 'या' गावाने घातला मतदानावर बहिष्कार

मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषदच्या कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी जाहीर केल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

'या' गावाने घातला मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Apr 23, 2019, 3:46 PM IST

औरंगाबाद - फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा या गावातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीवरचा बहिष्कार कायम ठेवला आहे. गावातील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी २० वर्षांपासून गावकरी करत आहेत. मात्र, मागणी पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांनी हा बहिष्कार टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात गावकऱ्यांना मतदानावर बहिष्कार टाकावा लागला ही लोकशाहीची थट्टा आहे.

मतदानाने बहिष्कार घातलेले गाव

गेली २० वर्षांपासून कविटखेड ते वडोदबजार या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. कविटखेड पासून वडोदबजार हे अवघ्या ३ किलोमीटरचे अंतर आहे. दवाखाना असो की शाळा, बँक असो की इतर काम करण्यासाठी गावातील लोकांना वडोदबजारला जावे लागते. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशातच राजकीत नेते मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नेते येतात आणि उदघाटन करून जातात. मात्र, काम होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन लिखित स्वरूपात प्रशासनाला कळवले. गावाबाहेर मुख्य रस्त्यावर मतदानावर बहिष्कार असल्याने कोणत्याही पक्षाने प्रचार करू नये, असा फलक देखील लावला. मात्र, समाधान कारक उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांनी बहिष्कार कायम ठेवला आहे.

मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा लावण्यात आली असली तरी गावातील मतदारांनी मतदान केलेच नाही. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषदच्या कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी जाहीर केल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कविटखेडा येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

Intro:फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा या गावातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीवरचा बहिष्कार कायम ठेवला आहे. गावातील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी 20 वर्षांपासून गावकरी करत आहेत, मात्र मागणी पूर्ण होत नसल्याने गावकऱ्यांनी हा बहिष्कार टाकलाय.

Body:भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघात गावकर्यांना मतदानावर बहिष्कार टाकावा लागला.

Conclusion:गेली 20 वर्षणापासून कविटखेड ते वडोदबजार या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. कविटखेड पासून वडोदबजार हा अवघ्या तीन किलोमीटरच अंतर आहे. दवाखाना असो की शाळा, बँक असो की इतर काम करण्यासाठी गावातील लोकांना वडोदबजारला जावं लागतं. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील अपघातांच प्रमाण वाढलं आहे. अश्यात राजकीत नेते मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलीय. नेते येतात आणि उदघाटन करून जातात. मात्र काम होत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन लिखित स्वरूपात प्रशासनाला कळवलं. गावाबाहेर मुख्य रस्त्यावर मतदानावर बहिष्कार असल्याने कोणत्याही पक्षाने प्रचार करू नये असा फलक देखील लावला. मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने गावकऱ्यांनी बहिष्कार कायम ठेवलाय. मतदान केंद्रावर मतदान यंत्रणा लावण्यात आली असली तरी गावातील मतदारांनी मतदान केलेच नाही. मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात येणाऱ्या विधानसभा, जिल्हापरिषदच्या कुठल्याच निवडणुकीत मतदान करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी जाहीर केल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झालाय. कविटखेडा येथील गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
chaupal
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.