जालना- शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार आज समोर आला. या मृतदेहाला अग्निशामक दलाने गांधीनगर भागातील कुंडलिका नदी पात्रातून बाहेर काढले.
नव्या आणि जुना जालन्यातील मध्यभागातून कुंडलिका नदी वाहते. या नदीवर जालना शहरात लहान मोठे ५ पुल आहेत. या सर्व पुलांच्या खालून हा मृतदेह वाहून जात होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा मृतदेह चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. त्यानंतर तो वाहत कदीम जालनाच्या हद्दीत आला आणि तसाच वाहत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचला. येथे अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेहाला बाहेर काढले. यावेळी सदर बाजार पोलीस देखील उपस्थित होते.
दरम्यान, मृतदेह झाडात आडकला असावा आणि आता नदीचे पाणी ओसरल्याने तो वाहत आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेह किती दिवसापूर्वीचा आहे हे उत्तरीय तपासणीनंतरच कळणार आहे.
हेही वाचा- जालन्यात एकता कपूरच्या पोस्टरला चपलेचा मार, भाजपने नोंदवला निषेध