ETV Bharat / state

ऑनलाईन शिक्षणात बदनापूर जिल्ह्यात प्रथम

कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अध्यापन व मूल्यमापन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत झालेल्या चाचणीत बदनापूर तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी दिली.

badnapur-taluka-came-first-in-online-education-in-jalna-district
ऑनलाईन शिक्षणात बदनापूर जिल्ह्यात प्रथम
author img

By

Published : Apr 25, 2020, 2:55 PM IST

बदनापूर (जालना) - कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अध्यापन व मूल्यमापन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत झालेल्या चाचणीत बदनापूर तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी दिली.

कोरोनाचा प्रार्दूभाव होऊ नये, म्हणून 17 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जिल्हा परिषदेच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकारी जालना यांनी सूचना देऊन शाळा बंद असल्यामुळे सर्व वर्ग व विषय शिक्षकांनी अभ्यासक्रमावर आधारीत अध्यापन झूम ॲप व व्हाटसॲपचा वापर करून ऑनलाईन पध्दतीने करावे, ऑन लाईन अध्यापन करताना दीक्षा ॲप, बालभारती आदींच्या वेबसाईटवरील व्हिडिओ व अभ्यास घटक वापरावे तसेच शिक्षकांनीही ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे असे सुचवले होते. त्याचप्रमाणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिकवलेल्या अभ्यासक्रमाबाबत 40 ते 60 प्रश्नांची प्रत्येक वर्गासाठी एक चाचाणी ऑनलाईन देण्यात आली होती. या चाचणीत इयत्ता 1 ली ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचेही सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 87820 विद्यार्थ्यांनी चाचणी क्रमांक 1 सोडवलेली आहे. या चाचणीत बदनापूर, जालना व अंबडमधील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक सरासरी सहभाग दिसून आला असून बदनापूर तालुक्यातील 23 एप्रिलपर्यंत 11290 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जालना जिल्ह्यातून सर्वाधिक सहभाग नोंदवून बदनापूर प्रथम क्रमांकावर आहे.

badnapur-taluka-came-first-in-online-education-in-jalna-district
ऑनलाईन शिक्षणात बदनापूर जिल्ह्यात प्रथम

या बाबत माहिती देताना गटशिक्षणधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी सांगितले की, बदनापूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र प्रमुख, गटसमन्वयक व सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले. योग्य वेळी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदनापूर तालुका ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात असताना जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला बसवल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.