ETV Bharat / state

'वारी लाल परीची' ; एसटी बसच्या परिवर्तनाविषयी महामंडळाचा जनजागृती उपक्रम - Maharashtra State Road Transport Corporation

एसटी बसच्या परिवर्तनाविषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सन १९४८ पासून एसटी बस मध्ये टप्प्याटप्प्याने कसे परिवर्तन झाले, याची संपूर्ण माहिती देणारी बस ३६ जिल्ह्यांच्या प्रवासाला निघाली आहे.

एसटी बसच्या परिवर्तना विषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे
author img

By

Published : Jul 24, 2019, 11:21 PM IST

जालना - 'बस फॉर अस' या फाउंडेशनच्यावतीने 'वारी लाल परीची' हा एसटी बसच्या परिवर्तना विषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १ जून २०१९ पासून मुंबई येथून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ३६ जिल्हे ही लाल परी फिरणार आहे. आज जालना बस स्थानकात या लाल परीचा ३८वा दिवस साजरा झाला.

एसटी बसच्या परिवर्तना विषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे
सन १९४८ पासून एसटी बसमध्ये टप्प्याटप्प्याने कसे परिवर्तन झाले, याची संपूर्ण माहिती या बसमध्ये देण्यात आली आहे. बसच्या आतील भागात बसचे फायदे, बसची ध्येय-धोरणे आणि आत्तापर्यंत बसचे बदललेले स्वरूप हे चित्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बसच्या बाजूलाच एका स्टॉलवर बसच्या आत्तापर्यंतच्या तिकिटांचे छायाचित्र असलेले आकर्षक कप, बॅच, की-चेन, अशा विविध वस्तूंचे प्रदर्शनही लावण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे प्रवाशांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. जालना बस स्थानकात आज दिवसभर ही बस उभी होती. या जनजागृती मोहिमेचे उद्घाटन मोटार परिवहन अधिकारी एस.एस. झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक उद्धव वावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेहुल, यंत्र अभियंता भास्कर मोरे, आगार प्रमुख पंडीत चव्‍हाण, स्थानक प्रमुख रत्नाकर लाड, लेखाधिकारी संघमित्रा त्रिभुवन हे अधिकारी उपस्थित होते. लाल परीच्या वारी सोबतच एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहितीही ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना दिली जात होती. यामध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास, स्वच्छता, स्मार्ट कार्ड या विषयांची माहिती दिली जात होती.

Intro:"बस फॉर अस" या फाउंडेशन च्या वतीने" वारी लाल परीची" हा एसटी बसच्या परिवर्तना विषयी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 1 जून 2019 पासून मुंबई येथून या उपक्रमाला सुरुवात झाली पन्नास दिवसात 36 जिल्हे ही लाल परी फिरणार आहे आज जालना बस स्थानकात या लाल परी चा 38 चा वाढदिवस आहे.

Body:सन 1948 पासून एसटी बस मध्ये टप्प्याटप्प्याने कसे परिवर्तन झाले त्याविषयी या बसमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बसच्या आतील भागात बस चे फायदे, बसची ध्येयधोरणे ,आणि आत्तापर्यंत बसचे बदललेले स्वरूप हे चित्राच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच सोबत बसच्या बाजूलाच एका स्टॉलवर बसच्या आत्तापर्यंत तिकिटांचे छायाचित्र असलेले आकर्षक कप, बॅच, किचैन ,अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन ही लावण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे प्रवाशांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. जालना बस स्थानकात आज दिवसभर ही बस उभी होती. या जनजागृती मोहिमेचे उद्घाटन मोटार परिवहन अधिकारी एस .एस. झाडबुके यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक उद्धव वावरे ,विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेहुल, यंत्र अभियंता भास्कर मोरे, आगार प्रमुख पडीत चव्‍हाण, स्थानक प्रमुख रत्नाकर लाड, लेखाधिकारी संघमित्रा त्रिभुवन, आदि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .
लाल परीच्या वारी सोबतच एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहितीही ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांना दिल्या जात होती. यामध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी ,दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास, स्वच्छता, स्मार्ट कार्ड ,आदी विषयांची माहिती देण्यात आली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.