ETV Bharat / state

ऐन दिवाळीत खड्डयांमुळे औरंगाबाद जालना महामार्गावरील वाहतूक खोळंबली... - aurangabad jalna highway traffic news

औरंगाबाद जालना महामार्गावर परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील डांबराचा थर निघून जाऊन ४-४ फूट रूंद व २ ते ४ फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून ऐन दिवाळीत प्रवाशांची लगबग असताना वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे.

औरंगाबाद जालना महामार्गावर 'ट्रॅफीक जॅम'
author img

By

Published : Oct 28, 2019, 12:37 PM IST

जालना - येथील औरंगाबाद जालना महामार्गावर परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील डांबराचा थर निघून जाऊन ४-४ फूट रूंद व २ ते ४ फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून ऐन दिवाळीत प्रवाशांची लगबग असताना वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे. या ट्रॅफिक जॅममुळे वाहनांच्या जागोजागी २-२ किमीच्या रांगा लागत आहेत.

जालना महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

ऐन दिवाळीत परतीच्या पावसामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून जालना ते बदनापूर २० किमीच्या अंतराला या खड्ड्यांमुळे १ ते २ तास लागत आहे. या महामार्गाची देखभाल व दुरुस्ती टोलवेज कंपनीकडे आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दूरवस्था झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. तर, अनेक चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे.

हेही वाचा - भिंगीच्या स्मशानभूमीत जादूटोण्याच्या संशयाने ग्रामस्थ भयभीत

जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते औरंगाबाद या ४ पदरी रस्त्यावर २ ठिकाणी टोल जमा करते. असे असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरण नसल्याचेच परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे. या संपूर्ण महामार्गाच्या दोन्ही चारही पदरावरील रस्त्यावर पावसाने ४ ते ५ फूट रूंद व २ ते ४ फूट खोल खोल खड्डे पडलेले आहेत. तर, पावसाचे पाणी त्या खड्डयात तुंबत असल्यामुळे मोटारसायकलस्वार त्यात जाऊन पडण्याच्या घटना घडत असतानाच चारचाकी वाहनांचेही ऑईल चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन ठिकठिकाणी वाहतूक जॅम होत आहे.

हेही वाचा - औरंगाबाद-जळगाव मार्गावर वाहनकोंडी; रस्त्याची झाली दैना

शुक्रवारी बदनापूर येथील बाजार असताना या खड्डयांमुळे व दिवाळी सणामुळे वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅफिक जॅम होऊन बदनापूर बसस्थानाकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने जवळपास २ ते ३ किमीपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतरही पावसाची हजेरी चालूच असल्यामुळे हे खड्डे बुजवता येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या ४ दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक मुंगीच्या गतीने चालू आहे. सध्या टोलवेज कंपनीकडून या खड्डयात खडी व मुरुमाचा भरणा करून मोठे मोठे खड्डे बुजवण्यात येत आहेत. वाहतुक कोंडीमुळे बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकरे यांनी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरवले. तरीही खड्डयांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होत नसल्याने नागरिकांत टोलवेज कंपनीबाबत प्रचंड नाराजी आहे.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये फटाका व्यापारांना मंदी आणि पावसाचा फटका...

याबाबत पाऊस उघडल्यावर औरंगाबाद ते जालना रस्त्यावर डांबराचा थर मारून संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे टोलवेज कंपनीकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी ऐन दिवाळी सणात मात्र, या महामार्गावर जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसात संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयीच संशय व्यक्त होत आहे.

हेही वाचा - जायकवाडी धरणातून गोदावरीत 51893 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Intro:बदनापूर, दि. 27 : औरंगाबाद- जालना महामार्गावर मात्र परतीच्या पावसाने रस्त्यावरील डांबराचा थर निघून जाऊन चार-चार फूट रूंद व दोन ते चार फूट खोल खडडे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून ऐन दिवाळीत प्रवाशांची लगबग असताना वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे. या ट्रॅफिक जॅममुळे वाहनांच्या जागोजागी दोन-दोन किलोमीटर रांगा लागत आहेत.

जालना ते बदनापूर 20 किलोमीटर अंतराला या गडडयामुळे 1 ते 2 तास लागत असून या महामार्गाचा देखभाल व दुरुस्ती टोलवेज कंपनीकडे असून त्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची दूरवस्था झालेली असून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत तर अनेक चारचाकी गाडयांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे. जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते औरंगाबाद या चार पदरी रस्त्यावर दोन ठिकाणी टोल जमा करते. असे असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरण नसल्याचेच परतीच्या पावसाने दाखवून दिले आहे. या संपूर्ण महामार्गाच्या दोन्ही चारही पदरावरील रस्त्यावर पावसाने चार ते पाच फूट रूंद व दोन ते चार फूट खोल खोल गडडे पडलेले आहेत. पावसाचे पाणी त्या गडडयात तुंबत असल्यामुळे मोटारसायकलस्वार त्यात जाऊन पडण्याच्या घटना घडत असतानाच चार चाकी वाहनांचेही ऑईल चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. खडडयामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन ठिकठिकाणी वाहतूक जॅम होत असून शुक्रवारी बदनापूर येथील बाजार असताना या खडडयामुळे व दिवाळी सणामुळे वाहतुकीत वाढ झाल्यामुळे ट्रॅफिक जॅमन होऊन बदनापूर बसस्थानाकापासून दोन्ही बाजूने जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतरही पावसाची हजेरी चालूच असल्यामुळे हे खडडे बुजवता येत नसल्याचे चित्र आहे. मागील चार दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक मुंगीच्या गतीने चालू असून सध्या टोलवेज कंपनीकडून या खडडयात खडी व मुरुमाचा भरणा करून मोठे मोठे खडउे बुजावण्यात येत आहेत. वाहतुक कोंडीमुळे बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकरे यांनी पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरवले तरीही खडडयांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होत नसल्यामुळे नागरिकांत टोलवेज कंपनीबाबत प्रचंड नाराजी आहे. या बाबत पाऊस उघडल्यावर औरंगाबाद ते जालना रस्त्यावर डांबराचा थर मारुन संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे टोलवेज कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी ऐन दिवाळी सणात मात्र या महामार्गावर जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पावसात संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे या कामाच्या क्वालिटीविषयीच संशय व्यक्त होत आहे.Body:खड्ड्यामुळे धीम्या गतीने चालणारी वाहतूकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.