ETV Bharat / state

Health Minister on vaccination : नोव्हेंबर अखेर राज्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न - राजेश टोपे

author img

By

Published : Nov 14, 2021, 12:58 AM IST

प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण वेगाने होत असून 'मिशन कवचकुंडल' (Mission kavach kundal) आणि 'दत्तक घर घर' (door to door vaccination) मोहिमेअंतर्गत लसीकरण सुरू असून घरा घरात जाऊन समजावून सांगून नागरिकांना लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहे. राज्यात पहिल्या डोसचे लसीकरण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपले पाहिजे, हे आरोग्य विभागाचे टार्गेट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे.

Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना - मुंबईत पहिल्या डोसचे आज 100 टक्के लसीकरण (viccination) पूर्णत्वास जात असून मुंबईतील नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन तसेच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister RajeshTope) यांनी केले आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण वेगाने होत असून 'मिशन कवचकुंडल' (Mission kavach kundal) आणि 'दत्तक घर घर'(door to door vaccination) मोहिमेअंतर्गत लसीकरण सुरू असून घरा घरात जाऊन समजावून सांगून नागरिकांना लसीकरणासाठी प्रयत्न सुरु आहे. राज्यात पहिल्या डोस 7 कोटींपेक्षा अधिक लोकांनी तर 3 कोटी पेक्षा अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आता राज्यात पहिल्या डोसचे लसीकरण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपले पाहिजे, हे आरोग्य विभागाचे टार्गेट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हे आव्हानात्मक काम असून जिल्हाधिकाऱ्यांना आशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
  • उदय सामंतांनी घेतलेला निर्णय चांगला -

काही जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाला वेग देण्यासाठी कडक निर्बंध घातले आहे. कायद्याने लसीकरण हे बंधनकारक नक्कीच नाही पण मानवजातीच्या सुरक्षिततेसाठी हे लसीकरण गरजेचे आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जगभरात लसीकरणाला महत्व असून लसीकरणासाठी नागरिकांना समजावून सांगणे हे आम्ही मिशन मोडवर करत असून जे लोक विरोध करत आहे. त्यांना समजावून सांगत असल्याचे देखील ते म्हणाले. उदय सामंत यांनी आज प्राध्यापकांना लसीकरण करणे बंधनकारक करणार असून लसीकरण न केलेल्या प्राध्यापकांना सुविधा दिल्या जाणार नसल्याचे म्हटले आहे. यावर देखील टोपे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचा हेतू चांगला असून त्यांनी चांगल्या हेतूनेच ते वक्तव्य केल्याचे देखील टोपे म्हणाले. प्राध्यापकांनी लसीकरण केलेच पाहिजे असेही त्यांनी सांगितले. दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी चिंता करण्यासारखे त्यात काही नाही असेही त्यांनी सांगितले.

  • डेल्टा व्हायरसवर आपल्या लसी प्रभावी -

युरोपमध्ये पाचवी लाट आली असून भारतात अजून तिसरी देखील लाट आली नाही याबाबत देखील टोपे यांनी भाष्य केले आहे. आपल्याकडे 80-85 टक्के लसीकरण झाले असून त्यामुळे अँटीबॉडीज वाढल्या आहे. जास्त लसीकरण झाले आणि डेल्टा व्हायरस हाच आज आपल्या देशात आढळतो. दुसरा जोपर्यंत म्युटेशन होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचा धोका नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. डेल्टा व्हायरसवर आपल्या लसी प्रभावी आहेत असंही ते म्हणाले. तिसरी लाट आली तरी सौम्य राहील असंही त्यांनी सांगितलं आहे.

  • केरळमधील व्हायरल गंभीर नाही -

कोरोना संकट कायम असताना केरळमध्ये नोरोव्हायरसने इन्ट्री केली आहे. याबाबत आपण तज्ज्ञांशी चर्चा केली असून याची फार गंभीरता नाही. हा व्हायरस रूटीनमध्ये आढळत असून त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

  • लसीकरण झालेल्या एकाचाही मृत्यू नाही -

मुंबई पालिकेने कोरोना विषाणूचे प्रकार शोधण्यासाठी चौथ्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहे यात लसीकरण झालेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. हा निष्कर्ष कदाचित मुंबईपुरता असण्याची शक्यता असून काही नागरिकांना दोन लस देऊनही इन्फेक्शन होऊन काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. तशा तुरळक केसेस आढळून आल्याचे देखील टोपे म्हणाले. या केसेसमध्ये वृद्ध आणि काही आजार असलेल्या नागरिकांचा समावेश असल्याचं देखील ते म्हणाले.

  • लस घ्या बक्षिस मिळवा -

चंद्रपूर महापालिकेने लसीकरण वाढवण्यासाठी नागरिकांना लस घ्या टीव्ही, फ्रिज वाशिंग मशीनची ऑफर दिलीय. ही ऑफर कौतुकास्पद आहे. लसीकरण वाढवण्यासाठी महापालिकेची ऑफर चांगली असून हे अनुकरणीय आहे असंही ते म्हणाले.

  • डोसमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न -

कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 84 दिवसांचे आहे. हे अंतर 28 दिवसांवर आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून लसीकरण वेगाने करण्यासाठी हे अंतर कमी करण्याची गरज आहे. अशी मागणी केंद्रीय आरोग्य विभागाकडे केल्याच देखील टोपे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात 999 नवीन कोरोनाबाधित तर 49 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.