ETV Bharat / state

वेडाच्या झटक्यामध्ये बरळणाऱ्या दानवेंचे तोंड काळे करणार; खोतकरांचा इशारा - farmers protest delhi

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर रावसाहेब दानवे यांनी हे आंदोलन पाकिस्तान आणि चीन पुरस्कृत असल्याचे म्हटले होते. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनीही रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

raosaheb danave over farmers protest i
दानवेंचे तोंड काळे करणार
author img

By

Published : Dec 13, 2020, 7:49 AM IST

Updated : Dec 13, 2020, 8:53 AM IST

बदनापूर (जालना)- शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचे आंदोलन संबोधणाऱ्या दानवे यांना वेडाचे झटके येत असून त्यांची तपासणी करण्याची गरज आहे, अशी टीका शिवसेना नेत अर्जून खोतकर यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांचे तोंड काळे करण्याचा इशारा देखील त्यांनी बदनापूर येथे दिला आहे.

बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने डिझेल, पेट्रोल दरवाढ, महागाई विरोध करत केंद्र सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. वाढत्या महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने बदनापुरात आंदोलनाचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, रावसाहेब दानवे यांचे करायचे काय.. आदी घोषणा देण्यात आल्या .तर केंद्र सरकारचा निषेध करणारी फलकेही आंदोलकांनी झळकवली होती.

वेडाच्या झटक्यामध्ये बरळणाऱ्या दानवेंचे तोंड काळे करणार

दानवेंचे तोंड काळे करणार-

पुढे बोलताना खोतकर म्हणाले, दानवे यांना वेडाचा झटका आल्यानेच ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे बरळले आहेत. रावसाहेब दानवे यांचे डोके ठिकाणावर नसून त्यांना वेड्याचे झटके येत आहेत, त्यांची रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. दानवे यांनी पहिल्यांदाच नाही तर अनेकदा शेतकऱ्यांची अवहेलना केलेली असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करत आले आङेत. मात्र, हा अपमान आता जिल्हयातील शेतकरी सहन करणार नसून त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराच खोतकर यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न-

कडाक्याच्या थंडीत न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारून केंद्रसराकरकडून शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. तसेच जाती–धर्मात भांडणे लावण्याचे काम भाजपकडून केले जात असून समाजा-समाजामधील भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक समाजाला असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे. जाती-पातीत भांडणे लावण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टीकडून सुरू असल्याचाही आरोप त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर केला.

बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी असल्याचे प्रतिपादन केले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भानुदास घुगे, जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण, युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, गणेश डोळस, राजेंद्र जैस्वाल, भरत सांबरे,राजेंद्र जऱ्हाड, शिकूरबाबा मिर्झा, सुनील बनकर, कैलास खैरे, अंबादास कोळसकर, शेख अय्युब, सुनील बळप यांच्यासह महाआघाडीतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Last Updated : Dec 13, 2020, 8:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.