ETV Bharat / state

रिकाम्या गॅस सिलिंडरच्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक - News about corona virus

जालना-औरंगाबाद महामार्गावर रिकाम्या गॅस सिलेंडरच्या ट्रकला भुशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. हा अपघात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडाला असून घटना स्थळाची पोलिसांनी पाहणी केली.

another-truck-hit-an-empty-gas-cylinder-truck-in-jalna
रिकाम्या गॅस सिलेंडरच्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक
author img

By

Published : Apr 27, 2020, 6:00 PM IST

जालना - रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरच्या रिकाम्या ट्रकवर भुशाचा ट्रक धडकला. हा अपघात सोमवारी पहाटे झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

रिकाम्या गॅस सिलेंडरच्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक

जालना औरंगाबाद महामार्गावर वरुडी चेक पोस्ट जवळ रात्री प्रवासादरम्यान रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा एक ट्रक थांबला होता. याचवेळी जालन्याहून औरंगाबादकडे भुसा घेऊन जाणारा दुसरा एक ट्रक या ट्रकवर धडकला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला पडले आहेत. दरम्यान भुशाचा ट्रक गॅस सिलेंडरच्या ट्रकवर मागून धडकल्यामुळे या ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने अपघातात कोणीही ही जखमी झाले नाही. ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.