ETV Bharat / state

जालना : भोकरदन तालुक्यात जनावरांची चोरी करणारी टोळी गजाआड

गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला भोकरदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

animal stealing gang arrest by bhokardan police in jalna
भोकरदन तालुक्यातील जनावरांची चोरी करणारी टोळी गजाआड
author img

By

Published : Nov 27, 2020, 9:21 PM IST

जालना - भोकरदन शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. या टोळीला भोकरदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

बाबा सुलेमान कुरेशी (३०, रा. कटकट गेट), बारक मोहम्मद पठाण (३२, रा. नायगाव), शेख नजीर शेख नूर (२३, रा. नायगाव, औरंगाबाद), मुख्तार उर्फ कालू शेख चांद (२८, नायगाव), सलमान रहमान पठाण (२०, रा. सईदा कॉलनी, औरंगाबाद), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघांनी भोकरदन तालुक्यातील जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. या तिघांना न्यायालयाच्या आदेशानुसार २२ नोव्हेंबर रोजी भोकरदन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भोकरदन शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. १२ ते १३ ऑक्टोबरदरम्यान फिर्यादी गणपत भागाजी वाडेकर यांच्या वालसा डावरगाव शिवतातील शेतातील गोठ्यातून चोरांनी दोन बैल, एक गाय आणि एक गोरे चोरी गेल्याची तक्रार दिली होती. यासंदर्भात भोकरदन पोलिसांचा तपास सुरू होता.

हेही वाचा -नौदलाचे मिग-29 के अपघातग्रस्त; एका वैमानिकाला वाचविले तर, दुसऱ्याचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.