ETV Bharat / state

भोकरदन : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकान जळून खाक

भोकरदन शहरातील सिल्लोड रस्त्यावरील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात दुकानातील साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

bhokardan
bhokardan
author img

By

Published : Jul 27, 2020, 4:16 PM IST

भोकरदन (जालना) - शहरातील सिल्लोड रोडवरील न्यायालयासमोर असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानातील टीव्ही, फर्निचर, फ्रिज व इतर साहित्य जळून खाक झाले. यामुळे लाखोचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भोकरदन शहरातील सिल्लोड रस्त्यावर असलेल्या रेणुका इंटरप्रायजेस या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागल्याचे पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मागे राहणारे डोभाळ यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच रेणुका दुकानाचे मालक राजेंद्र कानडजे यांना व अग्निशमन दलाला याबाबत माहिती. त्यानंतर सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. याची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.