जालना - दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मैदान गोठवण्याचा प्रयन्त शिंदे सरकारकडून Shinde Govt सुरू आहे. यावर विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे Opposition leader Ambadas Danve यांनी प्रतिक्रिया देताना या सरकारला मैदान गोठवता येणार नाही. इथं लोकशाही आहे. सरकारची दादागिरी चालणार नाही. इथं फक्त जनतेची दादागिरी चालते. अस स्पष्ट शब्दात शिंदे सरकार ला फटकारत ५६ वर्षांपासून त्या मैदानावर शिवसेनेचा मेळावा Shiv Sena gathering होत आहे.स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि अत्ता ही उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन करतील. त्याचं मैदानावर दसरा मेळावा होईल असं स्पष्ट संकेत शिंदे गटाला विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी जालन्यात माध्यमशी बोलताना दिले आहे.
CBI चा गैरवापर - दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरात काही शिवेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पडलेल्या आयकर विभागाच्या धाडीवर ही बोलताना अंबादास दानवे यांनी ED, CBI, IT चा वापर भारतीय जनता पक्ष्याकडून केल्या जात आहे .त्यांना जनता बधत नाही.काही नेते ही बधत नाही.अशा धाडीना आम्ही घाबरत नाही आणि घाबरणार ही नसल्याचं ही अंबादास दानवे यांनी म्हंटल आहे. घटनापिठा समोर झालेल्या सुनावणी वर बोलताना ही दानवे यांनी सरन्यायाधीशानी शिंदे गटाला " who are you" असा प्रश्न केला आहे त्यांचं काय उत्तर येत ते बघू नंतर शिवसेनेच्या चिन्हा बद्दल बोलू अशी प्रतिक्रिया दिलीय आज दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत मोसंबी पिकांवर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता सरसगट पंचनामा करण्याच्या सूचना जिल्हाधिकरी यांना केल्या.जालना शहरातील रस्त्याच्या प्रश्ना सह खामगाव महामार्गाच्या प्रश्नावर ही चर्चा केली सर्व चर्चा साकारात्मक पद्धतीने झाल्या असल्याचं देखील दानवे या वेळी म्हणाले.
हेही वाचा - love jihad Amravati लव्ह जिहाद मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशन मध्ये राडा