ETV Bharat / state

Dilip Walse Patil On Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आरोप खोटा - वळसे पाटील - Mahavikas Aghadi government

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणी जेलमध्ये टाकण्याची माहिती दिली? त्यावर ते बोलले असतील. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे ते म्हणाले.

Dilip Walse Patil On Fadnavis
वळसे पाटील
author img

By

Published : Jan 24, 2023, 6:21 PM IST

Updated : Jan 24, 2023, 8:38 PM IST

फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आरोप खोटा - वळसे पाटील

जालना - महाविकास आघाडीच्या काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मला टार्गेट करण्याची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक सहविचार सभेच्या निमित्ताने ते जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आरोपात काही तथ्य नाही - पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडले नाही. देवेंद्र फडणवीस यांना कोणी जेलमध्ये टाकण्याची कुणी माहिती दिली? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण द्याला हवे होते. असे आरोप करण्यात काहीच अर्थ नाही असे देखील वळसे पाटील म्हणाले.

विरोधकांना टार्गेट करण्यासाठी ईडीचा वापर - महाविकास आघाडीच्या अधिकाऱ्यांवर सरकार ईडीचा धाक दाखवून कारवाई करत आहे. असे म्हणत त्यांनी शिंदे-फडवीस सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांना टार्गेट करण्यासाठी ईडी, सीबीआयला कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरो त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. तसेच भाजपच्या नेत्यांना चांगले हे प्रकार चांगले माहीत असल्याचे ते म्हणाले.

एमआयएमचा वापर - भाजप भाजप स्वतःची पेटी म्हणून ओवेसी, एमआयएमला सातत्याने वापरत आली आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यांची युती फार काळ टीकणार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले होते. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, भाजप सातत्यांने सहकारी पक्षाचा वापर करीत आला आहे. त्यांनी तसाच उपयाेग एमआयएमचा केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन अडकवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता अशा आशयाची माहिती एका वृत्त वाहिनीवर दिली होती. त्यानंतर या प्रकरणी आधीच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर थेट तत्कालीन गृहमंत्र्यांनी आता उत्तर दिले आहे. एकूणच महाविकास आघाडीच्या सरकारने भाजपच्या नेत्यांच्या विरोधात कारस्थाने केली असा सूर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून निघताना दिसतो. मात्र यावर आता त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिल्याने फडणवीस काय पुरावे देतात का याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न - फडणवीस

Last Updated : Jan 24, 2023, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.