ETV Bharat / state

कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा प्राधान्याने मिळाव्यात - राजेश टोपे - Public Health and Family Welfare Minister Rajesh Tope

जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा पुरेशा प्रमाणात साठा, तसेच उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक इंजेक्शनचा हिशोब ठेवण्यात यावा. इंजेक्शन्स सर्व सामान्यांना चढ्या भावाने विक्री होणार नाही, तसेच याचा काळाबाजार होणार नाही, जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री टोपे यांनी दिले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे
जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 13, 2021, 7:08 PM IST

जालना - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, या दृष्टीने नियोजन करणे. तसेच इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत आहे. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत आहे. तसेच रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता त्यांचा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

रुग्णांना उत्तम दर्जाचे जेवण द्यावे
कोरोनाबाधित अथवा संशयित रुणांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच याठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना उत्तम दर्जाचे जेवण द्यावे, रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवणे, नियमितपणे रुग्णांची तपासणी करणे, रुग्णांची कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे

सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने अधिकच्या 250 ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात येत आहे. हे बेड रुग्णांसाठी तातडीने उपलब्ध होतील, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तसेच डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार यांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्बंध व सुचनांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होईल, यासाठी पोलीस विभागाने काम करणे, कंन्टेन्टमेंट झोनमध्ये निर्बंधाची अधिक कडकपणे अंमलबाजवणी करण्याबरोबरच मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहे.

एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचे वीलगीकरण करावे
जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटी-पीसीआर लॅब आहे. या लॅबची दरदिवसाची स्वॅब तपासणीची क्षमता एक हजारपेक्षा जास्त आहे. दरदिवशी त्या प्रमाणात चाचण्या झाल्याच पाहिजेच. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. कोरोना बाधितांच्यासंपर्कामधील व्यक्तींचा अचुकपणे शोध घेऊन, त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे तातडीने वीलगीकरण करण्यात यावे. कोरोना बाधितांच्या संर्पकातील व्यक्तिंचा डेटा नियमितपणे अपलोड होईल. तसेच जिल्ह्यात असलेल्या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने तातडीने घरी पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी दिले.

कोरोनापासुन बचावासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज
1 एप्रिल पासुन 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज किमान 25 हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात यावे. रविवारीसुद्धा लसीकरण होईल, याची दक्षता घेत लसीकरणामध्ये जालना जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप-विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - अवघ्या ३ तासांत अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी केली सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.