जालना - शहरातील दुःखी नगर परिसरात 20 पथकाच्या सहाय्याने 1 हजार 175 कुटूंबातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. हे सर्व्हेक्षण 16 एप्रिल, 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात एकच कोरोनाबाधित असलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सामान्य रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, 6 एप्रिलला कोरोनाबाधित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे 15 व्यक्तींना अटक; 15 वाहने जप्त-
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 159 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर,15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच 15 वाहने जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 499 व्यक्ती संशयित -
जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 499 व्यक्ती संशयित आहेत. सध्या रुग्णालयात 131 व्यक्ती भरती आहेत. तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 305 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 306 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 267, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 174 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.