जालना : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांनी खासदार सुप्रियाताई सुळे ( MP Supriyatai Sule ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संपूर्ण राज्यभर त्यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असून ठिकठिकाणी सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले असून या सर्व बाबी लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी तातडीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, असे मत माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Former Minister Aditya Thackeray ) यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य आहे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे.
गद्दारी केलेल्यांचा दुष्काळ संपला - माजी मंत्री आदित्य ठाकरे यांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात चढवला. ते म्हणाले की, माणुसकीचे पालन न करता ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा, त्यांचा दुष्काळ संपलेला आहे पण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा हीच अपेक्षा राज्यातील तमाम शेतकऱ्यांना आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
चित्रपटांवरील वादावर काय म्हणाले - हर हर महादेव या चित्रपटावरून सुद्धा राज्यामध्ये वाद निर्माण झाला असून या चित्रपटाचे निर्माते यांनी स्वतः समोर येऊन त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन लोकांसमोर येऊन आपले मत मांडायला पाहिजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून वाद निर्माण व्हायला नको कारण वाद निर्माण न होता मार्ग काढणे हे जरुरीचे आहे, असे मत सुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटाच्या वादावरून दिले जाते.