जालना - लॉकडाऊन नंतर सुरू झालेल्या मंदिरांमध्ये भोकरदन तालुक्यातील श्री. क्षेत्र राजूर येथील गणपती मंदिराचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून या गणपतीची ओळख आहे. या मंदिराला काल सव्वा लाख भाविकांनी भेट दिली. तसेच, मंदिराला 9 लाख 73 हजाराची देणगी देखील मिळाली.
हेही वाचा - आमची कुस्ती भाजप आणि एमआयएमसोबत - बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
काल सुमारे सव्वा लाख भाविकांनी गणरायाच्या चरणी माथा टेकवला. तर, अनेक भाविक मंदिरातील गर्दी पाहून आणि कोरोनाच्या भीतीमुळे प्रवेशद्वारच्या पायरीवरच माथा टेकून परतले. यावेळी गणपती संस्थांच्या विविध देणग्यांमध्ये देखील मोठी भर पडली. त्यानुसार प्रवेश देणगी 2 लाख 14 हजार, अभिषेक देणगी 44 हजार 642, बांधकाम देणगी 16 हजार 313, सुबक मार्बल देणगी 59 हजार 619, पार्किंग 14 हजार 580, श्रींची दानपेटी 3 लाख 43 हजार 74, बांधकाम देणगी 2 लाख 94 हजार 75, अशी एकूण 9 लाख 73 हजार 703 रुपयांची देणगी गणपती संस्थानला प्राप्त झाली.
आज झाली मोजणी
काल गणेश चतुर्थी झाल्यानंतर आज देणगीची मोजणी झाली. भोकरदनचे तहसीलदार हे या गणपती संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदेशानुसार गणपती संस्थानचे विश्वस्त गणेश उत्तमराव साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे यांच्या उपस्थितीमध्ये तलाठी ए.व्ही. कड, एस.पी कदम यांच्यासह साहेबराव खरात, श्रीराम पुंगळे आदींच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली.
हेही वाचा - 'केंद्र सरकारने गरिबांसाठीही कोरोनावरील लस मोफत द्यावी'