ETV Bharat / state

Jalna Fire : जालना शहरातील जुन्या टायरच्या गोडाऊनला लागली भीषण आग

जालना शहरातील एका जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत दुकानाचे मोठे नुकासान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.

टायर गोदामाला भीषण आग
टायर गोदामाला भीषण आग
author img

By

Published : May 27, 2023, 2:02 PM IST

Updated : May 27, 2023, 4:01 PM IST

जालना : जालना शहरातील भवानी नगरमध्ये असलेल्या जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या पथक आग शमवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीनं भीषण रूप धारण केले आहे. आग भडकल्यानंतर गोडाऊनच्या आजूबाजूला असलेल्या काही टपऱ्यांना देखील आग लागली आहे. आग शमवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत ही आग शमवली आहे.

दुकानाचे मोठे नुकसान : टायरच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत 6 लाख रुपयांचे जुने टायर जळून खाक झाले आहेत. शहरातील भवानी नगरमधील जुन्या टायरच्या दुकानाला दुपारच्या सुमारास आग लागली होती. ही आग जवळपास दोन ते अडीच तास सुरू होती. यात लाखो रुपयांचे जुने टायर जुळून खाक झाले आहेत. आग शमवण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. अग्मिशमन दलाचे दोन बंब आग शमवण्याचे प्रयत्न करत होते. परंतु आगीने रुद्र रूप धारण केल्याने गोडाऊनमधील सर्व टायरचा माल जळून खाक झाला आहे धुराचे लोट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत होते आगीचे ठिकाण दूरवरूनच शहरांमध्ये दिसत होते. आग कुठे लागली आहे ते दूरूनच कळत होते. प्राथमिक माहितीनुसार, टायरांचे गोडाऊन हे अझरखान कैसर खान यांच्या मालकीचे होते.

आगीचे घटना वाढल्या : दोन- तीन दिवसाआधी मुंबईत आणि पुण्यातही आगीच्या घटना घडल्या होत्या. पुण्यात टिंबरमार्केटमधील एका लाकडाच्या गोडाऊनला लागली होती. या वाढत्या आग लागण्याच्या घटना पाहता आपण आगीपासून वाचण्यासाठी काय उपाय केले पाहिजे. याची माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. दुकानात आग शमवणारे उपकरण असले पाहिजे. हे अग्निशामक उपकरणाची पिन अथवा क्लिप काढल्यानंतर हे उपकरण वापरता येते. या उपकरणातील धूर तुमच्या तोंडावर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

हेही वाचा-

टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागली भीषण आग

Fire Outbreak In Thane : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात दोन घरांना भीषण आग, 4 जण होरपळले

Last Updated : May 27, 2023, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.