ETV Bharat / state

खदानीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा हात अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू - भोकरदन तरुण मृत्यू

भोकरदन तालुक्यातील तीन तरुण चार चाकी वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते. शेजारी असलेल्या खदानीमध्ये हे तरुण पोहायल गेले व त्यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

a-boy-is-dead-due-to-drown-in-lake
खदानीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा हात अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू
author img

By

Published : Jan 23, 2020, 8:33 AM IST

जालना - आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि बचाव कार्य याविषयी जनजागृती आणि प्राथमिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल (एनडीआरएफ) हे बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यातच जालन्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खदानीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह काढण्यात यश आले. ही घटना बुधवारी घडली.

खदानीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा हात अडकल्याने पाण्यात बुडून मृत्यू

भोकरदन तालुक्यातील तीन तरुण चार चाकी वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर कागदपत्रांवर सही करण्यासाठी ते गेले. मात्र, अधिकाऱ्याला काहीतरी वेगळाच वास आल्यामुळे त्यांनी हे काम थांबविले. दरम्यानच्या काळात या तरुणांनी बाजूलाच असलेल्या खदानीमध्ये आंघोळ करून येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी हे तिघे जण कपडे काढून खदानीमध्ये उतरले पण दोनच जण बाहेर आले, एक मात्र आलाच नाही. त्यानंतर आरडाओरड सुरू झाली, खदानीच्या बाजूला असलेल्या टेकडीवर मुरूम भरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी देखील आरडाओरड सुरू करून चंदनजिरा पोलिसांना फोन केला. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या तरुणाचा शोध घेण्यासाठी जालना नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्री दहा वाजेपर्यंत शोधमोहीम चालू होती. शेवटी हतबल होऊन हे सर्च ऑपरेशन थांबविले.

दरम्यानच्या काळात जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला बचाव पथकाला दोन तास काहीच हाती लागत नाही, हे लक्षात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या जवानाने ऑक्सीजन सिलेंडर बांधून पाण्यात बुडी घेतली आणि अवघ्या दहा मिनिटातच तरूणाचा मृतदेह हाती बाहेर काढला.

जवानाने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने खदानीमध्ये उडी मारल्यानंतर खदानीत असलेल्या चरीमध्ये याचे हात अडकले आणि ते त्याला बाहेर न काढता आल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविली आहे. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये या जवानांच्या टीमने खदानीमधील पाणी ढवळून काढले होते. जर हात अडकले नसते तर मृतदेह पाण्यावरती आला असता, मात्र अडकलेल्या हातामुळे तो मृतदेह वर आला नाही. दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी एनडीआरएफच्या या टीमला हा मृतदेह शोधून काढण्यात यश आले.

हेही वाचा - '...तर त्यावेळी काँग्रेसने मोठी संधी गमावली असेच म्हणावे लागेल'

Intro:आपत्तीमध्ये करावयाच्या उपाययोजना आणि बचाव कार्य याविषयी जनजागृती आणि प्राथमिक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल (एनडीआरएफ)हे आज बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे.जिल्ह्यातील विविध शाळा ,महाविद्यालय ,नगरपालिका आणि संबंधित तहसीलदारांनी सुचविलेल्या ठिकाणांवर जाऊन जनजागृती करण्यासाठी ही पंधरा जणांची टीम जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे .आल्याबरोबर आज पहिल्याच दिवशी ही टीम खरोखरच नावाप्रमाणे आपत्तीमध्ये धावून आली.

Body:भोकरदन तालुक्यातील तीन युवक चार चाकी वाहनाचा परवाना काढण्यासाठी मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर कागदपत्रांवर सही करण्यासाठी ते गेले मात्र अधिकाऱ्याला काहीतरी वेगळाच वास आल्यामुळे त्यांनी हे काम थांबविलेअसावे. दरम्यानच्या काळात या तरुणांनि हा वास कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या खदानी मध्ये आंघोळ करून येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी हे तिघे जण कपडे काढून खदानी मध्ये उतरलेत्या पैकी 2 जण बाहेर आले .एक जण बाहेर आलाच नाही .आणि नंतर आरडाओरड सुरू झाली, खदानी च्या बाजूला असलेल्या टेकडीवर मुरूम भरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी देखील आरडाओरड सुरू करून चंदंनजिरा पोलिसांना फोन केला. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या तरुणाचा शोध घेण्यासाठी जालना नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री दहा वाजेपर्यंत शोध मोहीम चालू होती .शेवटी हतबल होऊन हे सर्च ऑपरेशन थांबविले. दरम्यानच्या काळात जिल्ह्यामध्ये हे जनजागृती करण्यासाठी एनडीआरएफ ची टीम जालन्यात दाखल झाली होती .खरेतर ही टीम गावोगावी जाऊन माहिती देणार होते, मात्र त्यांच्या नावाप्रमाणेच आज त्यांनी काम केले. आणि सकाळी साडेनऊ वाजताच वरिष्ठांचा आदेश मिळताच या खदानीत सर्च ऑपरेशन सुरू केले .सुरुवातीला दोन तास काहीच हाती लागत नाही हे लक्षात आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या जवानाने ऑक्सीजन सिलेंडर बांधून पाण्यात बुडी घेतली आणि अवघ्या दहा मिनिटातच तरूणाचा मृतदेह हाती लागला .
दरम्यान या जवानाने दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने खदानी मध्ये उडी मारल्यानंतर खदानीत असलेल्या चरीमध्ये याचे हात अडकले आणि ते त्याला बाहेर न काढता आल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता वर्तविली आहे .सुरुवातीच्या दोन तासांमध्ये या जवानांच्या टीमने खदानी मधील पाणी ढवळून काढले होते. जर हात अडकले नसते तर मृतदेह पाण्यावरती आला असता मात्र अडकलेल्या हातामुळे तो मृतदेह वर आला नाही .दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी एनडीआरएफच्या या टीमला हा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या कामाचे प्रशिक्षण आणि जनजागृती करण्यासाठी ही टीम आली आहे, ते कार्य त्यांनी प्रत्यक्ष करून दाखविले आहे. केवळ त्यांच्या कार्यतत्परते मुळेच आज एका तरुणाचा मृतदेह लवकर शोधण्यामध्ये पोलीस प्रशासनाला त्यांची मदत झाली. दरम्यान या ठिकाणी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक निलेश तांबे चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोठाळे. उपनिरीक्षक बोंडले आदींनी भेट देऊन वारंवार या प्रकरणाची माहिती घेतली होती.
** बाईट
1 एनडीआरएफचे उपनिरीक्षक
2 पोलीस उपनिरीक्षक श्रि कोठाळे चंदनझिरा पोलीस ठाणे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.