ETV Bharat / state

जालन्यात विठुरायाच्या ५१ फूट मूर्तीची प्राणप्रतिष्ठा - viththal idol

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आज जालन्यात विठुरायाच्या ५१ फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती
author img

By

Published : Jul 12, 2019, 8:43 PM IST

Updated : Jul 12, 2019, 11:36 PM IST

जालना - मराठवाड्यात सर्वात उंच असलेल्या विठुरायाच्या ५१ फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आली. परतूर तालुक्यातील वाटूर येथे श्री .श्री. रविशंकर अध्यात्मिक केंद्रात हा सोहळा पार पडला.

जालन्यात विठुरायाच्या ५१ फूट मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांचे वाटूर फाटा येथे अध्यात्मिक केंद्र आहे. याचे समन्वयक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि त्यांची पत्नी अर्चना वायाळ यांनी आज विधिवत विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. परतूर येथील पुरोहित तुकाराम पाठक यांनी त्याचे पौरोहित्य केले. अवघ्या ३ महिन्यांमध्ये या मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. ग्लास फायबर, लोखंड आणि तांबे या धातूंच्या माध्यमातून ही मूर्ती शिल्पकार नंदकुमार हुंबे यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे .सिमेंटमध्ये कॉलमच्या साह्याने ही मूर्ती उभारण्यात आली. या मूर्तीचे आयुष्य आजच्या स्थितीत तरी ५० वर्ष असणार आहे. मात्र, दर ५ वर्षांनी या मूर्तीची दुरुस्ती करुन या मूर्तीचे आयुष्य वाढविण्यात येणार असल्याची माहितीही वायाळ यांनी दिली.

आज या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती. शालेय विद्यार्थ्यांनी दिंड्या काढून वारकऱ्यांनी खांद्यावर भगवा पताका घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत या परिसराला पंढरीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी दिवसभर विठ्ठल भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.

Intro:मराठवाड्यात सर्वात उंच असलेल्या पांडुरंगाच्या 51 फूट उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आली. परतूर तालुक्यातील वाटूर येथे श्री .श्री. रविशंकर अध्यात्मिक केंद्रात आज हा सोहळा पार पडला.

Body:आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री. श्री. रविशंकर यांचे वाटुर फाटा येथे अध्यात्मिक केंद्र आहे. याचे समन्वयक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि त्यांची पत्नी सौ .अर्चना वायाळ यांनी आज विधिवत पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली .परतूर येथील पुरोहित तुकाराम पाठक यांनी पौरोहित्य केले. अवघ्या तीन महिन्यांमध्ये या मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे ग्लास फायबर, लोखंड, तांबे ,या धातूंच्या माध्यमातून 51 फूट मूर्ती ,शिल्पकार नंदकुमार हुंबे यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे .सिमेंटमध्ये कॉलम च्या साह्याने ही मूर्ती उभी आहे .या मूर्तीचे आयुष्य आजच्या स्थितीत तरी पन्नास वर्ष असणार आहे. मात्र दर पाच वर्षांनी या मूर्तीची दुरुस्ती करून या मूर्तीचे आयुष्य वाढविण्यात येणार असल्याची माहितीही वायाळ यांनी दिली. आजच्या या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा निमित्ताने पंचक्रोशीतील भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती. शालेय विद्यार्थ्यांनी दिंड्या काढून वारकऱ्यांनी खांद्यावर भगवा पताका घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष करत या परिसराला पंढरीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेली ही भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी दिवसभर विठ्ठल भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत.

Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.