जालना - राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शुक्रवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीचा हा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी जालना तहसील कार्यालयातून जालना विधानसभा मतदारसंघासाठी २९ उमेदवारांनी ४६ अर्ज खरेदी केले आहेत.
हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
जालना तहसील कार्यालयात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये विविध विभाग स्थापन करण्यात आले असून त्याचसोबत निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाचीही व्यवस्था इथेच करण्यात आली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा 'प्लान बी' तयार, पोलिसांबरोबर झडप होण्याची भिती ?
शुक्रवारी १० वाजल्यापासून तहसील कार्यालयात अर्ज विक्रीसाठी उपलब्ध होते. तीन वाजेपर्यंत ४६ अर्ज उमेदवार घेऊन गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारचा हा पहिला दिवस आहे. येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना दुपारी तीन वाजेपर्यंत तहसील कार्यालयामध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?