ETV Bharat / state

35 टक्के उमेदवारांनी फिरवली राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेकडे पाठ - जालना राज्य लोकसेवा आयोग परीक्षेला विद्यार्थी अनुपस्थित

रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची वाट पाहणाऱ्या 852 विद्यार्थ्यांनी आज झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेकडे पाठ फिरविली आहे. या परीक्षेमध्ये वारंवार होणाऱ्या बदलाचा हा परिणाम असून उमेदवारांनी याचे खापर सरकारच्या माथी फोडले आहे.

जालना
जालना
author img

By

Published : Mar 21, 2021, 3:35 PM IST

जालना - खूप अभ्यास करायचा आणि सरकारी नोकरी मिळवायची, असा विचार करून रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची वाट पाहणाऱ्या 852 विद्यार्थ्यांनी आज झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेकडे पाठ फिरविली आहे. या परीक्षेमध्ये वारंवार होणाऱ्या बदलाचा हा परिणाम असून उमेदवारांनी याचे खापर सरकारच्या माथी फोडले आहे.

जालना

जालना शहरात आज आठ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरू झाली. जिल्ह्यातून एकूण 2 हजार 448 उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. मात्र, त्यापैकी सहा अर्ज हे ते नामंजूर करण्यात आले. उर्वरित 2442 विद्यार्थ्यांपैकी 852 विद्यार्थी आज या परीक्षेला गैरहजर असल्याचे पहिल्या सत्रात दिसून आले आहे. गैरहजर असलेल्या उमेदवारांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. केवळ राज्य शासनाने वारंवार तारखा बदलल्या नंतरही संबंधित उमेदवाराला कोणताही ईमेल किंवा मोबाईलवरून संदेश दिला गेला नाही. त्यामुळे देखील उमेदवारांना परीक्षेविषयी माहिती नसल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

सीसीटीव्ही कॅमेराची नजर

प्रत्येक परीक्षा केंद्रावर असलेल्या परीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत आणि या सर्वांचे नियंत्रण संबंधित परीक्षा केंद्रप्रमुख यांच्या दालनात करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली असून तसे काही घडल्यास त्याची खात्री आणि शहानिशा करण्यासाठी देखील प्रशासनाने उपाययोजना म्हणून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे.

कडक बंदोबस्त आणि तपासणी

आठ परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर होताच. मात्र, त्यासोबत जिल्हा प्रशासनाने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कसून आरोग्य तपासणी केली. त्यांना तपासणी करण्यासाठी पीपीई तिकीट घातलेले आरोग्य कर्मचारी देखील परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते त्यांचे तापमान तपासून योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या.

हे आहेत गैरहजर उमेदवारांचे आकडे

  • बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय एकूण विद्यार्थी 240 गैरहजर 84.
  • श्री सरस्वती भुवन महाविद्यालय 360 पैकी 125 गैरहजर.
  • सी टी एम के गुजराती विद्यालय 288 पैकी 92 गैरहजर.
  • शासकीय तंत्रनिकेतन दोनशे चाळीस पैकी 85 गैरहजर .
  • श्री महावीर जैन इंग्रजी माध्यम 360 पैकी 126 गैरहजर .
  • सेंट मेरी हायस्कूल दोनशे चाळीस पैकी 97 हजर.
  • जे ई.एस. महाविद्यालय 288 पैकी 107 गैरहजर.
  • श्री महावीर जैन मराठी माध्यम 399 पैकी 163 गैरहजर.
  • एकूण राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देणाऱ्या 2442 उमेदवारांपैकी 852 उमेदवार गैरहजर होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.