जालना - बुलढाणा अर्बन बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण करत तीन लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन जालना शाखेतून मोंढा शाखेत संबंधित रक्कम घेऊन जात असताना सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
बँकेचे दोन कर्मचारी दुचाकीवरुन सकाळी 10:55 ला निघाले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने पाळत ठेवून हनुमान मंदिराजवळ त्यांची दुचाकी आडवली.
दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारला. पैशाची बॅग देण्यासाठी विरोध होत असल्याचे लक्षात येताच कुदळीच्या दांड्याने चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
हे दोन्ही कर्मचारी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघांनाही डोक्याला मार लागल्याने टाके पडले आहेत.