जालना - रक्ताचे पाणी करुन शेतकरी शाररिक मेहनतीच्या जोरावर कसदार शेती करकत आहेत. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी हताश होताना दिसत आहे. निसर्गाने साथ न दिल्याने आणि बँकांनी कर्ज न दिल्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकारी पाशात अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जालन्याचे शेतकरी सावकारी पाशात अडकले पेरणीसाठी लागणारे बियाणे घेण्यापासून ते उत्पादन झालेला माल बाजारपेठेत नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना अनेक वेळा सावकारांकडून व्याजाने कर्ज घ्यावे लागते. मात्र, विकलेल्या मालाला योग्य दर न आल्याने सावकरांकडून घेतलेले कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे सावकारी पाश अधिकच घट्ट होताना दिसत आहे. मागील वर्षीचे देणे बाकी असल्यामुळे सावकार दुसऱ्या वर्षी परत कर्ज देत नाहीत. त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना आपली शेती या सावकारांच्या नावावर लिहून द्यावी लागते.
व्याज आणि मुद्दल न फिटल्याने सावकार शेतकऱ्याची जमीन हडप करत आहेत. दोन ते पाच एकर शेती असलेले अनेक शेतकरी या प्रकारात मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये जून २०१९ च्या अखेरीस २१६ शेतकऱ्यांनी कलम १८ नुसार अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये १६७ प्रकरणांमध्ये संबंधित सावकारांवर कारवाई करण्याचे काम पडले नाही. १९ सावकारांवर सध्या कारवाई चालू आहे, तर सावकाराने लाटलेल्या तीस शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित तलाठ्याला आणि आधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
२१६ शेतकऱ्यांनी २७ हेक्टर ८३ आर एवढी जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र, यातील पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. उर्वरित 15 शेतकऱ्यांच्या जमिनी या परत करण्यासाठी सावकार टाळाटाळ करत आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला सावकारांनी औरंगाबादच्या विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील केले आहे. त्यामुळे या पंधरा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी फास अजूनही कायम आहे.
Intro:Body:
१५ Farmers trapped in money lender Mesh in jalna
निसर्गाने साथ न दिल्याने जालना जिल्ह्यातील १५ शेतकरी सावकारी पाशात
जालना - रक्ताचे पाणी करुन शेतकरी शाररिक मेहनतीच्या जोरावर कसदार शेती करकत आहेत. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी हताश होताना दिसत आहे. निसर्गाने साथ न दिल्याने आणि बँकांनी कर्ज न दिल्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकारी पाशात अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पेरणीसाठी लागणारे बियाणे घेण्यापासून ते उत्पादन झालेला माल बाजारपेठेत नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना अनेक वेळा सावकारांकडून व्याजाने कर्ज घ्यावे लागते. मात्र, विकलेल्या मालाला योग्य दर न आल्याने सावकरांकडून घेतलेले कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे सावकारी पाश अधिकच घट्ट होताना दिसत आहे. मागील वर्षीचे देणे बाकी असल्यामुळे सावकार दुसऱ्या वर्षी परत कर्ज देत नाहीत. त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना आपली शेती या सावकारांच्या नावावर लिहून द्यावी लागते.
व्याज आणि मुद्दल न फिटल्याने सावकार शेतकऱ्याची जमीन हडप करत आहेत. दोन ते पाच एकर शेती असलेले अनेक शेतकरी या प्रकारात मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये जून २०१९ च्या अखेरीस २१६ शेतकऱ्यांनी कलम १८ नुसार अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये १६७ प्रकरणांमध्ये संबंधित सावकारांवर कारवाई करण्याचे काम पडले नाही. १९ सावकारांवर सध्या कारवाई चालू आहे, तर सावकाराने लाटलेल्या तीस शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित तलाठ्याला आणि आधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
२१६ शेतकऱ्यांनी २७ हेक्टर ८३ आर एवढी जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र, यातील पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. उर्वरित 15 शेतकऱ्यांच्या जमिनी या परत करण्यासाठी सावकार टाळाटाळ करत आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला सावकारांनी औरंगाबादच्या विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील केले आहे. त्यामुळे या पंधरा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी फास अजूनही कायम आहे.
केवळ शारीरिक मेहनतीच्या जोरावर कसदार शेती करून सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी शेतकरी रक्ताचे पाणी करतात .मात्र निसर्ग साथ देत नसल्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रयत्न विफल जात आहेत. म्हणूनच खासगी सावकारां ची लॉटरी लागत असून शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्याचे काम खाजगी सावकार करीत आहेत. यातूनच जालना जिल्ह्यामध्ये सावकारी पाशातून 15 शेतकरी मुक्त झाले आहेत मात्र आणखीन पंधरा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती हा फास आवळण्याचा प्रयत्न सावकार करीत आहेत.
Body:
पेरणीसाठी बियाणे घेण्यापासून ते उत्पादन झालेला माल मोढ्यामध्ये विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक वेळा या सावकाराकडून थोडी -थोडी रक्कम व्याजाने घ्यावे लागते. आणि शेवटच्या टप्प्यात माल विकल्यानंतर आलेल्या पैशातून सावकाराचे व्याज आणि मुद्दल चुकविण्याचा प्रयत्न करतात. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे माल मोढ्यामध्येजाणे तर सोडाच पण जमिनीच्या वरही पीक येण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत .याचा परिणाम सावकारी पाश अधिकच घट्ट होत आहे. मागील वर्षीचे देणे बाकी असल्यामुळे सावकार दुसऱ्या वर्षी परत रक्कम व्याजाने देत नाही. आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आपली शेती या सावकारांच्या नावावर लिहून द्यावे लागते. विश्वासू माणसांच्या मध्यस्थीने हा सर्व करार केला जातो, नोंदणी कार्यालयात ही शेती संबंधित सावकाराच्या नावावरही केली जाते. परंतु कालांतराने व्याज आणि मुद्दल फेडल्यानंतरही सावकार ही शेती शेतकऱ्यांच्या नावावर परत करताना टाळाटाळ करतो. दोन ते पाच एकर शेती असलेले शेतकरी या प्रकारात मोठ्या प्रमाणात भरडला. जातात कारण स्वतंत्र शेती करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसते ,त्यामुळे मजुरा पासून जनावरां पर्यंत सर्वोच्च यंत्रणा उधार-उसनवारी वर करावी लागते. त्यामुळे खर्च वाढून उत्पादन कमी होते .
जालना जिल्ह्यामध्ये जून 2019 चा अखेरीस 216 शेतकऱ्यांनी कलम 18 नुसार अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये 167 प्रकरणांमध्ये संबंधित सावकारांवर कारवाई करण्याचे काम पडले नाही .19 सावकारांवर सध्या कारवाई चालू आहे, तर सावकाराने लाटलेल्या तीस शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित तलाठ्याला किंवा सक्षम आधिकाऱ्याला आदेश दिले आहेत. 27 हेक्टर 83 आर एवढी जमीन या शेतकऱ्यांनी सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र यातील पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत, उर्वरित 15 शेतकऱ्यांच्या जमिनी या परत करण्यासाठी सावकार टाळाटाळ करत आहेत. आणि जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला त्यांनी औरंगाबादच्या विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील केले आहे. त्यामुळे या पंधरा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती चा फास अजूनही कायम आहे.
खाजगी सावकारीमुळे होत असलेल्या त्रासाबाबत जिल्ह्यातील 324 शेतकऱ्यांनी सहाय्यक उपनिबंधका मार्फत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार यांची चौकशी करून तथ्य नसलेल्या 167 सावकारांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 109 सावकारांचे प्रकरणे चौकशीसाठी चालू आहेत .आणि 48 सावकार परवानगीशिवाय म्हणजेच अवैध पद्धतीने सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या त्यापैकी सात प्रकरणात तेरा आरोपींवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये 124 अधिकृत परवानाधारक सावकार आहेत. *महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 16 अन्वय शेतकऱ्याने सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे जर खाजगी सावकाराची तक्रार केली तर हे अधिकारी संबंधित सावकाराच्या घराची झडती घेऊन चौकशी करून पडताळणी करू शकतात. याचअधिनियमातील कलम 18 नुसार शेतकऱ्यांच्या तक्रारी मध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित शेतकऱ्याकडून सावकाराकडे ठेवलेली गहाण जमीन परत मिळावी म्हणून त्यांच्याकडून दावा दाखल करून घेण्यात येतो.* * सर्वात जास्त खाजगी सावकार परतूर तालुक्यात* जालना जिल्ह्यामध्ये जालना 7 ,अंबड 3, घनसावंगी 5 ,परतूर 14 ,मंठा 9,जाफराबाद 9 ,भोकरदन एक असे एकूण 48 खाजगी सावकार विनापरवाना सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे .यामध्ये सर्वात जास्त संख्या परतूर तालुक्यात आहे. याउलट बदनापूर तालुक्यात एकही अवैध सावकार नाही. * सावकाराकडे जमिनी गहाण ठेवल्यानंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशी होऊन जिल्हा उपनिबंधकांनी जालना तालुक्यातील 8, अंबड 2, घनसावंगी 5, परतूर 11, मंठा 3 ,आणि भोकरदन एक अशा एकूण तीस शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधिताच्या नावावर करून देण्यासाठी तलाठ्याला आदेश दिलेले आहेत.* **** परतूर तालुक्यातील वैजोडा या गावातील शेतकरी शिवाजी गायवळ यांनी एका सावकाराकडून दोन लाख रुपये घेतले होते. या दोन लाख रुपयांच्या बदल्यात सव्वा एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवली होती. ज्या जमिनीची किंमत बाजार भावानुसार आठ लाख रुपये होते. दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात दोन लाखाचे सात लाख रुपये चक्रवाढ व्याजासह फेडले ,मात्र जमीन नावावर करून देण्यासाठी सावकार चकरा मारायला लावत आहे, एवढेच नव्हे तर गावातील लोकांच्या हाताने दबाव आणून शिवीगाळही केला जात आहे. परंतु अशा प्रकरणात चकरा मारून मारून कायदा माहीत झालेल्या भगवानराव तांगडे यांच्या संपर्कात शिवाजी गायवळ आले आणि त्यांच्या मदतीने त्यांनीदेखील जिल्हा उपनिबंधकांकडे धाव .घेतली आता हे प्रकरण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले असून लवकरच त्यांची जमीन परत मिळणार आहे.* हि स्टोरी यापूर्वी देखील पाठविलेले आहे मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांचे बाईट नव्हते म्हणून आज शेतकऱ्यांचे बाईट घेऊन हि स्टोरी परत पाठवत आहे
Conclusion: