ETV Bharat / state

बदनापूर तालुक्यातील अवैद्य वाळू साठ्यावर छापा, १४० ब्रास वाळू जप्त - बदनापूर येथील अवैद्य वाळू साठ्यावर छापा

विविध नदी पात्रांतून अवैद्यरित्या वाळू उपसा करून त्याचा साठा वाळू माफियांकडून केला जात आहे. अशा दोन वाळू साठ्यांवर पोलीस व महसूल प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईत १४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

140 brass Illegal sand stocks seized in Badnapur jalna
बदनापूर तालुक्यातील अवैद्य वाळू साठ्यावर छापा, १४० ब्रास वाळू जप्त
author img

By

Published : May 19, 2020, 7:19 PM IST

बदनापूर ( जालना ) - तालुक्यातील विविध नदी पात्रांतून अवैद्यरित्या वाळू उपसा करून त्याचा साठा वाळू माफियांकडून केला जात आहे. अशा दोन वाळू साठ्यांवर पोलीस व महसूल प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईत १४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

बदनापूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून लॉकडाऊनमध्ये विविध नदी पात्रांतून अवैधरित्या वाळू केला जात आहे. अनेकदा वाळूची वाहने प्रशासनाकडून पकडण्यात येत आहेत. यामुळे वाळू माफियांनी चोरून वाळू साठा करण्यास सुरूवात केली होती. वाळू माफियांनी तालुक्यातील रामखेडा व अकोला शिवारात मोठा वाळू साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी सोमवारी (ता. १८ मे) सायंकाळी त्या साठ्यावर छापा टाकला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर, सहाय्यक फौजदार शेख इब्राहिम, बदनापूर सज्जा तलाठी सुनील होळकर यांनी संयुक्तरित्या केली. या कारवाईत १४० ब्रास वाळू जप्त करून त्याचा पंचनामा करण्यात आला. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष; सीईओकडून पाहणी

हेही वाचा - Exclusive Interview : केंद्राकडे अन्नधान्याची कमी नाही, मात्र राज्य सरकारनेही काही वाटा उचलावा - केंद्रीय राज्यमंत्री खा. दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.