ETV Bharat / state

भुसावळात तरुणाचा दगडाने ठेचून खून; घटनेचे कारण अस्पष्ट - जळगाव गुन्हे बातमी

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका 35 वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी समोर आली असून, शहरात खळबळ उडाली आहे. संदीप गायकवाड (वय 35 वर्षे, रा. समतानगर ध्यान केंद्राजवळ, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Apr 13, 2021, 7:19 PM IST

Updated : Apr 13, 2021, 8:16 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका 35 वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी समोर आली असून, शहरात खळबळ उडाली आहे. संदीप गायकवाड (वय 35 वर्षे, रा. समतानगर ध्यान केंद्राजवळ, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बोलताना पोलीस अधिकारी

भुसावळ शहरातील 40 खोली भागातील हनुमान मंदिराजवळ सोमवारी (दि. 12 एप्रिल) रात्री उशिरा ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी 40 खोली भागात एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी पडलेल्या मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केल्यानंतर मृत व्यक्ती हा संदीप गायकवाड असल्याची माहिती समोर आली. या घटनेबाबत मृताच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते देखील घटनास्थळी आले होते. मृत संदीप गायकवाड याच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला होता.

श्वान पथक व फॉरेन्सिक टीम दाखल

या घटनेचा तपास करण्यासाठी जळगाव येथून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळी पडलेल्या वस्तू आणि इतर बाबींचे संकलन केले. श्वान पथकाने घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य मार्गपर्यंत माग काढला. मारेकरी खून केल्यानंतर तेथून वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.

भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमागे पूर्ववैमनस्य आहे का? मृत संदीप याचा कोणाशी वाद होता का? यासारख्या बाबी पोलीस तपासून पाहत आहेत. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून, त्यांना लवकरात लवकर अटक होईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

हेही वाचा - जळगाव : मूहुर्त गुढीपाडव्याचा, मात्र 'सुवर्णनगरी'त एक रुपयाचीही उलाढाल नाही !

Last Updated : Apr 13, 2021, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.