ETV Bharat / state

जळगावात रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या - Asoda Railway gate Suicide News

शहरातील असोदा रेल्वेगेट परिसरात एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या शरिराचे दोन तुकडे झाले.

Young man Suicide Jalgaon
असोदा रेल्वेगेट आत्महत्या बातमी
author img

By

Published : Feb 28, 2021, 10:45 PM IST

जळगाव - शहरातील असोदा रेल्वेगेट परिसरात एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या शरिराचे दोन तुकडे झाले. त्याच्या खिशात फोटो, पाकीट व रुमाल आढळून आला आहे. मात्र, नाव व पत्ता याबाबत काहीच माहिती नसल्याने तरुणाची ओळख पटू शकली नाही.

हेही वाचा - जळगाव: जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधितांची नोंद

असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, अमलदार प्रमोद पाटील व अमित बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठले असता, खांब क्र.४२१/२१ ते ४२१/२० या दरम्यान, रुळावर शरिराचे दोन तुकडे झालेले आढळून आले. तुकड्यांच्या बाजूला चप्पल होती, तर खिशात रुमाल व पाकीट होते. त्यात फोटो होते.

अकस्मात मृत्यूची नोंद

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. फोटो व चप्पलवरून पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - जळगाव : पदाधिकारी नसल्याने आंदोलन टाळण्याची राष्ट्रवादी महिला काँग्रेसवर नामुष्की

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.