ETV Bharat / state

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'जलनिती' क्रियेचा जागर; जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचा उपक्रम - जळगाव कोरोना बातमी

कोरोना संसर्गाची तिसरी लाट काही दिवसात उसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट वेळीच थोपवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन सातव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जलनिती क्रियेचा घराघरात जागर करण्यात येणार आहे.

जलनिती
जलनिती
author img

By

Published : Jun 14, 2021, 10:21 PM IST

जळगाव - कोरोना संसर्गाची तिसरी लाट काही दिवसात उसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही लाट वेळीच थोपवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन सातव्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जलनिती क्रियेचा घराघरात जागर करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आणि पारस मिरॅकल उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांना योगाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जलनिती क्रिया कशी लाभदायी आहे, याची माहिती देऊन ही क्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाणार आहे.

नागरिकांना जलनिती भांडे मिळणार मोफत

जळगाव शहरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात नागरिकांना जलनिती भांडे मोफत दिले जाणार आहे. सोबतच प्रत्येक घरातील एका सदस्याला जलनिती क्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल. नंतर हा सदस्य त्याच्या घरातील इतर सदस्यांना ही क्रिया शिकवेल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.

काय आहे जलनिती क्रिया ?

जलनिती क्रियेविषयी माहिती देताना जळगावातील योग मार्गदर्शक अनिता पाटील यांनी सांगितले की, जलनिती ही एक योग शुद्धी क्रिया आहे. योग क्रियेद्वारे नासिका मोकळी केल्यानंतर जलनिती क्रिया केली जाते. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. डोकेदुखी, सर्दी यासारखे आजार बरे होतात. कोरोनाचा विषाणू हा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. तत्पूर्वी तो काही वेळ नाकात असतो. जलनिती क्रियेद्वारे या विषाणूला शरीराबाहेर काढले जाऊ शकते, असे अनिता पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, कोरोनाचे सावट कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.